- देवा थोडं ध्यान दे
- माझ्याकडे कान दे
- सतीश मालू सम मला
- समाजात मान दे
- हरी सारखा दोस्त दे
- त्याच्या सारखी शिस्त दे
- मित्रासंगे बोलतांना
- त्याच्या सारखी भिस्त दे
- अरे तुरे बोलायाचं
- हरी तू असा वर दे
- शब्दवचन पेरण्यास
- मला एक पाभर दे
- नबी सारखा मनमौजी दे
- सुखी संसाराचे सुत्र दे
- सात्विक विठ्ठलासम
- डाँक्टर पुत्र दे
- प्रकाश माने वाणी मला
- भोळा भाबडा दोस्त दे
- रावसाहेब बाबरासारखी
- जगण्याची शिस्त दे
- शेता मधलं पिक दे
- मातीमधला गंध दे
- पिकामध्ये राबणारा
- बाळू सारखा भाऊ दे
- अमर पाटीलचा ताल दे
- शिस्त संयमाचे बोल दे
- अमर सारखे मलाही
- जगण्याचे खरे मोल दे
- शिवाजी सारखा बाणा दे
- रुपनुर सारखा कान्हां दे
- पैसे सांभाळत जगी
- जगण्याचं बाणा दे
- मोहन माने गोड मवाळ
- ऐसा एक गोपी दे
- समारंभी शुभ ऐशी
- त्याच्यासारखी टोपी दे
- संजय थोराताचा शब्द
- बोलण्याचे मर्म दे
- अशोक बाबर समीक्षक
- लेखनाचा धर्म दे
- वसंत गिड्डे सत्य वचनी
- ठाम असा विश्वास दे
- बिनधास्त जगण्याचा
- असा वसंत श्वास दे
- श्रीधराचा आंबेडकरी
- अशी मला साद दे
- संविधानी शब्द अमृती
- असा मला प्रसाद दे
- मोहन हिरुगडे, सुभाष
- पाटील सत्व बोल दे
- जगी उजेड दिसेल ऐसा
- प्रकाशाचा तेज पोल दे
- मदगौंडाचा रुबाब दे
- स्पष्ट बोलण्याचे बळ दे
- जगी दु:ख थोडे थोडे
- सोसण्याची कळ दे
- मोहिते,अब्दुल, हजारे
- पृथ्वीचा तो गोल दे
- निकम मधुकर सम
- जगण्याचा डौल दे
- प्रकाश, दिलीप भोसले
- एन् .के.असा प्रकाश दे
- पांडू लांडगे मणेराजुरी
- असा खुला आकाश दे
- देवा रे देवा बाप्पा
- काय मागू मी तुला ?
- सगळ्यामधले गुण घेण्या
- मुबारकला मती दे
- (पाभर : पेरणीचे यंत्र)
- -मुबारक उमराणी
- सांगली
- ९७६६०८१०९७
0 टिप्पण्या