- काय वर्णू मी थोरवी
- शूरवीर शिवबांची
- महाराष्ट्रात रोवली
- मुहूर्तमेढ स्वातंत्र्याची !!
- अधर्मासंगे लढले
- धर्मासाठी न्यायासाठी
- माणुसकीच पूजली
- लढलेत हक्कासाठी !!
- परस्त्री माते समान
- महामंत्र त्यांनी दिला
- मानून लेकी समान
- बोळविले शत्रू सुनेला !!
- जातिपंथास नसेच थारा
- मानले सर्वधर्म समान
- स्वराज्यासाठी प्राणपणाने
- लढले हिंदू,मुसलमान !!
- शककर्ता युगपुरुष
- धन्य ती जिजाऊ माय
- कोटी मुजरे तयांसी
- जय जय शिवराय !!
- माय भवानी पावली
- दिली अजिंक्य तलवार
- जिजाऊ नर रत्न पुत्र
- शिवाचाच अवतार !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा.पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला
- 9923488556
0 टिप्पण्या