मुंबई : सध्या अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या शोमुळे चर्चेत आहे. कपिल नेटफ्लिक्स स्पेशल आय अँम नॉट डन येट शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. २८ जानेवारी रोजी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोमध्ये कपिलने त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. दरम्यान, कपिलने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या घरी आमंत्रण नसतानाच गेल्याचे सांगितले आहे.
शाहरुखशी संबंधीत किस्सा सांगताना कपिल म्हणाला, तो एकदा त्याच्या चुलत बहिणीसोबत कारमधून बाहेर जायला निघाला होता. तेव्हा चुलत बहिणीने शाहरुख खानचा मन्नत बंगला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा कपिल नशेत होता. त्याने बहिणीचे बोलणे ऐकले अन् शाहरुखचा बंगला मन्नतच्या इथे गेला.
आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा तेथे पार्टी सुरु होती. बंगल्याचे दरवाजे उघडे होते आणि मी माझ्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याचा निर्णय घेतला. मी ड्रायव्हरला म्हटले कार बंगल्याच्या आतमध्ये घेऊन चल. सिक्युरिटी गार्डने माझा चेहरा पाहिला आणि मला ओळखले. त्याला असे वाटले की आम्हाला पार्टीचे आमंत्रण आहे. त्यामुळे त्याने आम्हाला जाऊ दिले असे कपिल म्हणाला.
पुढे कपिल म्हणाला, जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा मला जाणवले की मी चुकीचे काम करत आहे. मी तेथून निघण्याचा निर्णय घेतला. तेवढय़ात शाहरुखचा मॅनेजर तेथे आला आणि त्याने आम्हाला आतमध्ये बोलावले. त्यावेळी रात्रीचे तिन वाजले होते. मी मद्यधुंद अवस्थेत होतो. दरवाजा खोलून आत गेलो तर तिथे गौरी तिच्या मैत्रीणींसोबत बसली होती. मी तिला हॉलो म्हटले. त्यावर तिने शाहरुख आत आहे बघ असे म्हटले. मी आत गेलो तर शाहरुख डान्स करत होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणलो सॉरी भाई, माझ्या चुलत बहिणीला तुझे घर बघायचे होते म्हणून मी गेट उघडे होते तर आत आलो. त्यावर शाहरुखनने माझ्या बेडरुमचा दरवाजा उघडा दिसला तर तू तिथे पण आत येणार का? असे म्हटले होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या