Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

विजय खंडारे

    असे म्हणतात कला ही ईश्‍वरी देणगी आहे. हे जरी खरे असलेतरी समाजातील खालच्या वर्गातून येणार्‍या एखाद्या खर्‍या कलाकाराला मोठय़ा दिव्यातून मार्गक्रमित करून स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागते. अशा कलाकारांच्या अंगभूत कलाकारीला समाजातून प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते. असे झाल्यास मोठय़ा शहरातच कलाकार जन्माला येतो, ही समजून मोळकडीस येऊन गावखेड्यातून नागराज मंजुळे, विजय खंडारे जन्माला आल्यावाचून राहणार नाही, असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये.

    विजय खंडारे हे नाव आजघडीला महाराष्ट्रात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या बराबरीने चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. तिवसा मतदार संघातील निंभोरा बैलवाडी गावात राहणारा विजयचे पैशाअभावी बीएससीचे शिक्षण अपूर्ण राहिले. लहानपणीपासूनच भाजीपाला विकण्यापासून मिळेल ते काम त्याने केले. सोशलं मीडियामुळे अनेकजणांना वेळ लावले आहे. काही याचा सकारात्मक वापर करताना दिसतात तर अनेकजण नको त्या मार्गाने गेल्याने त्यांचे आयुष्य उद्वस्त करून बसल्याचे अनेक उदाहरणे आहे. मात्र, गरिबीचे चटके खाऊन स्वकर्तृत्वाने स्वताला सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशात आई-वडील, बहिण तसेच पत्नीची मोठी साथ लाभत आहे.

    त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सपत्नीक त्याचा सत्कार केला. तसेच कुठलीही मदत लागल्यास मी तुझ्या पाठीशी आहे, असा विश्‍वास दिला. सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केलेल्या या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याच्या स्टाईलने अनेकांना भुरळ पाडली आहे. आतापर्यंत हिंदी, तेलुगू, मल्याळम यासारखे अनेक भाषेत हे गाणे रिलीज झाले आहे. त्यासोबत एका युट्यूबरने या गाण्याचे मराठी व्हर्जन तयार केले आहे. सध्या हे गाणे तुफान हिट ठरले आहे. जेव्हा तेलुगू गाणे रिलीज झाले तेव्हा सहजच मी ते ऐकलं. हे गाणे ऐकायला फारच मनमोहक आहे. म्हणून मी सहजच दोन तीन वेळा ऐकले.

    त्याच्या दोन तीन दिवसानंतर ते गाणे पुन्हा इतर भाषेत रिलीज झाले. पण ते पाहिल्यानंतर असे वाटले की या भाषेत झाले, पण मराठीत रिलीज झालेले नाही. त्यामुळे, मला सहजच वाटले की याचे मराठीत गाणे केले. आणि त्यानंतर मी ते लिहायला बसलो. गाण्याचा साउंडट्रक आणि चाल तीच ठेवली. पण, शब्द माझे मी ते गाणे व्यवस्थित लिहिले आणि ते रचल्यानंतर घरातील व्यक्तींना ऐकवले. त्यानंतर माज्या आई-वडिलांनी चांगले गाणे आहे, असे मला सांगितले. आणि त्यानंतर मी रेकॉर्डिंगसाठी गेलो. दीड महिना आधी गाणे रेकॉर्ड केले. प्रोफेशनल करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. आम्ही एक कॅमेरामॅन ठरवला पण तो आलाच नाही. त्यावेळी पर्याय नसल्याने आम्ही तो संपूर्ण व्हिडीओ मोबाईलवर रेकॉर्ड केला.

    -प्रमोद बायस्कर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code