Recent in Technology

Advertisement

Breaking News

सैराट फेम आर्चीला रिअल परशा मिळाला?

    मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने अभिनेत्री रिंकू राजगुरू ला खूपच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात रिंकूसोबत आकाश ठोसरच्या अभिनयाने चाहत्याच्या मनात घर केले. या चित्रपटातील रिंकू म्हणजे, आर्ची आणि आकाश म्हणजे, परश्याची जोडीली चाहते आजही विसरलेले नाहीत. रिंकू आणि आकाश दोघेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपआपले अपडेटस देत असतात. सध्या रिंकू आणि आकाश दोघांना डिनर डेटवर पाहिल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

    रिंकू आणि आकाशने नुकतेच डिनर डेटचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोत रिंकूने पांढर्‍या रंगाचा स्वेटशर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर आकाशने पांढरा स्वेटशर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केली आहे. यावेळी दोघांनी पांढर्‍या रंगाचेच कपडे घातल्याने दोघेजण एकमेंकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

    याच दरम्यान आकाशचा लांब केस आणि दाढीमधला लुक लक्षवेधी ठरला. या फोटोत रिंकू आणि आकाश दोघेजण सेल्फी घेण्यासाठी आरशासमोर पोज देताना दिसले आहेत. यावेळी दोघेही एकमेकांसोबत आनंदीत दिसत होते. रिंकूने या फोटोच्या कॅप्शनमध्ये जेवण खूप जास्त झालं आता उद्या जास्तवेळ कार्डिओ करावं लागेल. असे म्हटले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काही चाहत्याने आर्ची आणि परश्या एकमेंकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यासोबत काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे. रिकूने सैराटनंतर मेकअप, कागर आणि झुंड या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ती सहाय्यक दिग्दर्शक राम महिंद्र यांच्या आगामी बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. तर सैराटनंतर आकाशने काही चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केल आहे. यात एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड चित्रपट आणि लस्ट स्टोरीज ही वेब सीरीज केली. तसेच तो हिंदी वेबसीरिज लस्ट आणि १९६२: द वॉर इन द हिल्समध्येही झळकला.

    (Images Credit : Pudhari)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code