नवी दिल्ली : देशात सर्वसामान्य जनतेला, परवडणार्या किमतीला उत्तम दर्जाची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने, केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने २00८ साली प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत, , नागरिकांना स्वस्त दरात, उत्तम दजार्ची जेनेरिक औषधे विकत घेता यावीत यासाठी देशभरात अनेक ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र या नावाने औषधांची दुकाने सुरु करण्यात आली. मार्च २0२५ पयर्ंत देशभरात अशी १0,५00 केंद्रे सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
देशात ३१ डिसेंबर २0२१ पयर्ंत, सुमारे ८६४0 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यापैकी २७६ जन औषधी केंद्रे बिहार राज्यात आहेत. देशभरातील जनऔषधी केंद्रांची राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय यादी सोबतच्या परिशिष्टात जोडली आहे.
जेनेरिक औषधी म्हणजे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी औषधे देखील असतात. सध्या १,४५१ औषधे आणि शस्त्रक्रियांसाठी लागणार्या २४0 वस्तू जेनेरिक स्वरूपात उपलब्ध आहेत. यात सर्व महत्वाच्या उपचारात्मक औषधांचा समावेश आहे. यात, कार्डिओव्हॅस्क्यूलर म्हणजे हृदयरोग, कर्करोग विरोधी, मधुमेह विरोधी, संसर्ग रोखणारी औषधे, अँलर्जी प्रतिबंधात्मक औषधे, जठराशी संबंधित आजारावरील औषधे,निसर्गोपचाराशी संबंधित औषधे अशा सर्व औषधांचा समावेश आहे. देशभरात सुरु असलेल्या ८,६00 प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातून ही सगळी औषधे उपलब्ध आहेत.
0 टिप्पण्या