Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मानवता धर्म माना...

  भिन्न धर्मियांनी आता
  रंग वेगळा वाटला
  माणुसकी धर्म मात्र
  पुरा पुरा हो बाटला
  धर्म रक्षण करण्या
  स्वधर्माची असो चाड
  पर धर्म द्वेषापोटी
  नका करू हल्ला भ्याड
  जरी भिन्न धर्म सारे
  शिकवण देती एक
  नको संघर्ष कदापि
  मार्ग धरावा तो नेक
  रंग वेगळे वेगळे
  वेगळ्याच चालीरीती
  बंधुतेची कायमच
  जोडा अतूट हो नाती
  धर्मरुप पेहराव
  शोभे तयाशी सुंदर
  नको बंधने उगाच
  असो हिजाब पदर
  धर्म जाती पंथ असा
  नका करू भेदाभेद
  पेरलेच कोणी विष
  विचारास द्यावा छेद
  सारे रंग एक होता
  मिळे शांतीचे प्रतिक
  नाव धर्माचे घेऊन
  करू नका अगतिक
  ठेवा करारी तो बाणा
  मूळ धर्माचे ते जाणा
  मानवता धर्म माना
  जगी ऐक्य भाव आणा
  -युवराज गोवर्धन जगताप
  काटेगाव ता.बार्शी
  जिल्हा सोलापूर
  8275171227

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code