Header Ads Widget

मज रोखता न आले

समजावता न आले , माझ्या मनास थोडे
मज रोखता न आले ,त्या आसवास थोडे

सोडून माय गेली ,तान्ह्या पिलास जेव्हा
मज बांधता न आले ,त्या पावलास थोडे

झाले हजार तुकडे , जेव्हा स्वप्नफुलांचे               
मज सांधता न आले, त्या काळजास थोडे

गाळू नकोस अश्रू , अवकाळ पावसाचे
वादे तुझे कळू दे ,  सा-या जनास थोडे

जे  सांगतात  येथे , अश्रूस  भाव नाही
मज जाणता न आले,त्या मानवास थोडे 

तेजीत भाव आहे , खोटेपणास येथे।                
पण बोलता न आले, मज पामरास थोडे

देशात अर्थ होते , जर  लाख साठलेले
का वाटले न त्यानी , त्या शोषितास थोडे 

अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या