Recent in Technology

Advertisement

Breaking News

सोशल मीडियासंदर्भात कडक कायद्यांची तयारी

    नवी दिल्ली : सोशल मीडियासंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

    सोशल मीडिया निरंकूश न राहता त्यावरील चुकीचे प्रकार टाळण्यासाठी अधिक कडक कायदे आणि निबर्ंध असण्याची मागणी सातत्याने केली जाते. अनेकदा सोशल मीडियाशी निगडीत सायबर गुन्ह्यांना म्हणावा तसा न्याय मिळत नाही. काँग्रेस खा. आनंद शर्मा यांनी आज, शुक्रवारी सोशल मीडिया कंपनींना अधिक उत्तरदायी आणि जबाबदार ठरवण्यासाठी सरकार काय करीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. याप्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सी इंडियन कॉम्प्यूटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीम किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारे कारवाई करतात.

    याबाबत एक मध्यवर्ती पोर्टल देखील आहे जिथे अशा प्रकरणांची नोंदणी केली जाऊ शकते आणि संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीकडे पाठविली जाऊ शकते. मी तुमच्याशी सहमत आहे की आपण एक समाज म्हणून पुढे येऊन अधिक उत्तरदायीत्व आणि जबाबदारीची भावना आपण निर्माण केली पाहिजे असे वैष्णव यांनी सांगितले. तसेच सभागृहात एकमत झाल्यास सोशल मीडिया कंपन्यांना अधिक जबाबदार करणे आणि सोशल मीडियावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे यासाठी हे पाऊल उचलण्यात येईल, त्यासाठी सरकार तयार असल्याचे वैष्ण यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code