Header Ads Widget

बिग बी अमिताभ बच्चन झाले आजोबा, नातू झाला !

    मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन हे इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. नव्या नवेली, अगस्त्य आणि आराध्या यांच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पौत्रर%ाचा लाभ झाला आहे.

    बिग बींचे सख्खे बंधू अजिताभ यांची मुलगी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर यांना पुत्रर%ाचा लाभ झाला आहे. नैना आणि कुणाल यांचा विवाह २0१५ मध्ये झाला होता. लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. कुणालनेच ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. तो म्हणतोय की, नैना आणि मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आता आम्ही एका सुंदरश्या मुलाचे आई-बाबा झालो आहोत. तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार, असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या