Header Ads Widget

काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीला प्रारंभ

    * दि. ९ फेब्रुवारी रोजी माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला दारव्हा तालुक्यात प्रारंभ

    दारव्हा : स्थानिक विर्शामगृह येथे दि. ९ फेब्रुवारी रोजी माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला दारव्हा तालुक्यात प्रारंभ यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत दारव्हा तालुका व शहर काँग्रेस डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात झाली.

    स्थानिक विर्शाम गृह दारव्हा येथील सभागृहात संपन्न झालेल्या डिजीटल सदस्य नोंदणी शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सै.फारूकजी तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी माणिकरावजी ठाकरे,प्रमुख उपस्थिती राहुलजी ठाकरे माजी अध्यक्ष जि.प.यवतमाळ,उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी,ज्ञानेश्‍वरराव बोरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी,अनिल गायकवाड सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी, गणेशराव म्हातारमारे सरचिटणीस जि.काँग्रेस कमिटी,मनमोहनसिंग चव्हाण मा.सभापती जि.प.दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश नवरंगे,पंढरीनाथ सिंहे सरचिटणीस जि.काँग्रेस कमिटी, गजाननराव बिबेकर मा.अध्यक्ष दिग्रस विधान सभा क्षेत्र, गुलाबराव राठोड, अतुल राऊत अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, रामधन जाधव अध्यक्ष सेवादल काँग्रेस,विजय पाचकोर सचिव जि.काँग्रेस कमिटी,ज्ञानेश्‍वर खोडे सचिव जि.काँग्रेस कमिटी,व्यासपीठावर उपस्थित होते,यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते स्व. गानसम्राध्दी, भारतर%, लतादीदी मगेंशकर यांच्या प्रतिमेचे पूजन,व विनम्र अभिवादन करून र्शद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी प्रास्ताविक करताना दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश नवरंगे म्हणाले की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नोंदणी अभियानाला या राज्यात सुरूवात झाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात डिजीटल सदस्य नोंदणी करून येणार्‍या काळात काँग्रेस पक्ष स्वबळावर मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

    ह्यावेळी डिजीटल सदस्य नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अनिल गायकवाड यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली. तालुक्यातील रामगांव (हरू) नखेगांव, शेन्द्री,पेकर्डा येथील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या १५ ते २0 युवकांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून जाहिर प्रवेश केला,त्या नंतर मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहा असे सांगीतले,त्यानंतर डिजीटल सदस्य नोंदणी,व पक्ष संघटना बाबत कार्यक्रमा चे मार्गदर्शक माणिकरावजी ठाकरे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस पक्षाची बांधनीची सुरूवात कशी केली, त्यांनी राष्ट्रासाठी त्यावेळेस केलेल्या कार्याची व्यथा कार्यकर्त्यांसमोर मांडली. पुढील महिन्यात होणा-या नगर परिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती च्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने आतापासूनच कामाला लागा, निवडणूका जिंकल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे सुद्धा कार्यकर्त्याना ठणकावून सांगीतले, राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून डिजीटल सदस्य नोदणीमुळे पक्षाचे संघटन मजबूत होण्याचे स्वप्न साकार होणार असुन निष्ठावंत व कर्तृत्वशिल कार्यकत्यार्ना, युवकांना, महिलांना काम करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे असे सांगीतले, म्हणुन सर्व काँग्रेस पक्षाच्या आजी, माजी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, डिजीटल सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करून काँग्रेस पक्षाला वैभव प्राप्त करून राहुल गांधी यांचे हात बळकट करावे शेवटी माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त स्त्यावर उतरून काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाचे नेते स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू,स्व.इंदिराजी गांधी, यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहिर निषेध व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या