अमरावती : 7 फेब्रुवारी हा दिवस उजळतात आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई ची आठवण येते माता रमाई मुळे महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभुषण, संविधान करते, ज्ञानाचे प्रतिक होऊ शकले जिच्या त्यागाने अनेकांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळाली अशा माता रमाई ची जयंती विश्वशांती नगर शेगाव रहातगाव रोड प्रभाग क्रमांक एक येथे साजरी करण्यात आली सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला आयु. देवरेआई व थुलआई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सोबतच दिपप्रज्वलन करून अभिवादन केले याचवेळी परिसरातील स्मृतीशेष विनय गेडाम यांना उपस्थितानी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. पानतावणे यांनी माता रमाईच्या त्यागातून स्त्रियांनी कोणता संदेश घ्यावा या विषयावर विचार व्यक्त केले रमाई संदर्भात विचार मांडत असताना उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले सोबतच रमाई मुळेच भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले म्हणून स्त्रियांनी आपल्या घरातील माणूस चळवळीत काम करीत असेल तर त्यांचे घरातील अर्धे काम स्वतःवर घेऊन त्याला कार्य करण्यास वेळ द्यावा हीच खरी माता रमाई ची प्रेरणा ठरेल असे विचार व्यक्त केले सूत्रसंचालन प्रा. अरविंद पाझारे यांनी केले शिल्पा हिने स्वरचित कविता सादर केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन विश्वशांती नगरातील महिला भगिनी ठाकरे काकू, मधुरीताई सोनोने, सुनीता खंडारे, सुनीता देवरे, मोहोडकाकु, बारसेताई, वैद्यताई, जयाताई पानतावणे, शुभांगी तायडे, शिल्पा पाझारे, भोंगाडे ताई, खडसेताई, तायडे काकू, शीतल मेश्राम, सोनटक्के ताई, निकिता सुखदेवे, दीक्षा ठाकरे, शीतल सुखदेवे, गजभिये ताई यांनी केले यावेळी कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक उपसिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या
0 टिप्पण्या