Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

वडिलांनी शिवीगाळ केली, म्हणून मुलगा त्यांना ठार मारू शकत नाही

    मुंबई उच्च न्यायालायचा निर्वाळा

    मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे की, कोणताही मुलगा आपल्या वडिलांना केवळ ओरडा किंवा शिव्या दिल्याने मुलगा त्यांना ठार मारू शकत नाही. किरकोळ शिव्या दिल्याने मुलाला त्याच्या वडिलांचा खून करण्यास प्रवृत्त करता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.२0१३ साली मुलाकडून वडिलांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. दरम्यान, खंडपीठाने हे बोल सुनावले आहेत. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. मात्र, आरोपींनी शिक्षा कमी करण्याची विनंतीही केली.

    काय आहे प्रकरण?

    १३ डिसेंबर २0१३ ची घटना आहे, खून झालेल्या मुलाचे वडील कोल्हापूर आणि शिर्डीच्या मंदिरात पुजारी म्हणून कामाला लागले होते, ते मुलाला देखील त्याच ठिकाणी कामावर जाण्यास सांगायचे, पण मुलाला त्याला मान्य नव्हते. कधी कधी वडिलांना या गोष्टीचा राग यायचा. तेव्हा वडिलांनी संतापून मुलाला सांगितले की, तुला कुठेतरी नोकरी लागेपयर्ंत घरी राहू नकोस. वडिलांचे बोलणे ऐकून आरोपीला राग आला आणि त्याने एका वृद्धाला चापट मारली. यामुळे वडिलांना आणखी राग आला आणि त्याने आपले वर्तन सुधारण्यास सांगितले. असे सांगितल्यानंतर आरोपीने चाकू काढून वडिलांवर वार केले. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

    कोर्टात झाली वादावादी

    मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान खून केलेल्या मुलाने सांगितले की, वडिलांच्या टोमणेने अचानक वैतागून हे पाऊल उचलले. खून हा दोषी वर्गात असल्याने त्याची शिक्षा कमी करावी, अशी विनंती मुलाने न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, वडिलांनी तुम्हाला शिवीगाळ केली, असे आम्ही गृहीत धरले आहे, मात्र केवळ शिव्या दिल्याने कोणीही आपल्या वडिलांना मारू शकत नाही, इतर माणसेही केवळ शिवीगाळ करून दुसर्‍याला मारू शकत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code