पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सलग दोन वर्षे जानेवारीपयर्ंत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि उपस्थितीबाबत समस्या निर्माण होत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे आता २0२२-२३ या शैक्षणिक वषार्पासून ह्यआरटीईअंतर्गतची प्रवेश प्रक्रिया ३0 सप्टेंबरपयर्ंत पूर्ण करावीच लागणार आहे. ३0 सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षात ह्यआरटीई च्या २५ टक्के राखीव जागांसाठी एकाच टप्प्यात प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येणार आहे. शाळेत प्रवेशासाठीची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा लघुसंदेश पाठवला जाईल. पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जागा रिक्त राहिल्यास दुस?्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रतीक्षा यादीत नाव असण्याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल, असा नाही. काही स्वयंसेवी संस्था, पालकांना अर्ज भरून देताना विद्यार्थ्याच्या निवासाचे स्थान जाणीवपूर्वक शाळेच्या जवळ दाखवतात किंवा चुकीचे भरतात. या संबंधित संस्थांबाबत तक्रार दाखल झाल्यास संस्थांबाबत कायदेशीर कारवाई करावी.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या