यवतमाळ : कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनार्थ दिग्रस शहरातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे आकलन तसेच प्रत्येक घराघरांमध्ये छत्रपतींचे विचार रुजावे हा दृष्टिकोन ठेवून जयंती महोत्सवानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन दरवर्षी जयंती साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे याहीवर्षी शिवजयंतीच्या पर्वावर शिवसामान्यज्ञान स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसामान्यज्ञान स्पर्धा दिग्रस शहरातील संपूर्ण माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आली असून इयत्ता पाचवी ते सातवी तसेच सातवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून दोन्ही गटातील स्पधेर्तील प्राविन्य प्राप्त विद्याथ्यार्ना प्रथम बक्षीस पंचवीस शे रुपये बक्षीस दोन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस पंधराशे रुपये असे दोन गटात विगणी करण्यात आली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सभाग घेण्यात यावा. स्पर्धा आयोजन दिनांक १६ फेब्रुवारी २२ रोजी असून या स्पर्धे मध्ये सहभागी होण्याठी दिनांक १४/२/२0२२ पयर्ंत विद्याथ्यार्नी आपल्या शाळेत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. उत्तरे लिहिण्यास डटफ शीट असणार आहे. निळ्या किंवा काळया पेनचा वापर करावा. अचूक पयार्याचे वतरुळ डार्क करावे. उत्तर पत्रिकेवर संपूर्ण नाव, शाळेचे नाव, वर्ग, पालकांचा मोबाईल क्रमांक अचूक लिहणे आवश्यक राहणार आहे तसेच विद्यार्थ्यांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे.जास्तीत जास्त विद्याथ्यार्नी दिनांक १४/0२/२0२२ पयर्ंत आपल्या शाळेत नोंदणी करावी.
परीक्षा ही स्पर्धा नि:शुल्क असून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दिग्रसयाच्या आयोजनात घेण्यात येणार आहे नोंदणी साठी संपर्क -परीक्षा आयोजन समिती सदानंद देशमुख , शिव सामान्यज्ञान परीक्षा प्रमुख – गिरीष साबळे गजानन गोटे दिलीप महीपाल यांचे कडे करण्यात यावी.