- कोणी काहीही सांगो
- त्याला मी माननारच नाही
- कारण माननं हा ब्राह्मण वाद
- अन
- जाणून घेणं हा बुद्धिवाद आहे
- आणि म्हणून मी जाणलं
- माझ्या जाणत्या शिवबाची जयंती
- नको मला पाखंडी तिथी
- एकोणीस फेब्रुवारीच
- माझ्या राजाची जयंती
- साजरी करणार आहे ……
- माझ्या शिवबाचे
- ऐतिहासिक कार्य
- समध्या जगाला माहीत आहे
- आमचा लोकमान्य राष्ट्रपिता
- महात्मा फुलेंचे आम्ही वारस
- शिवबाची जयंती आम्ही मावळे
- 19 फेब्रुवारीलाच साजरी करू
- आमच्या कर्तृत्वान राजाची
- आता आम्ही ही वाचला
- खरा इतिहास पुरंदरे बेडेकर मेहंदळे
- साळगावकरांच्या फसव्या जाहिरातीला
- बळी पडणार नाही
- माझ्या रयतेच्य राजाची जयंती
- 19 तारखेलाच करू साजरी
- मग येईल शिवशाही
- माझ्या राजानं
- माणुसकी धर्माचा स्वीकार करून
- झिडकारले धर्मशास्त्र
- सर्वधर्मसमभाव पेरून
- संत तुकारामांना गुरू मानून
- निर्माण केलं स्वराज्य
- कोण हिंदू कोण मुस्लिम
- राज्यात त्यांच्या समता होती
- आदर स्त्री धर्माचा
- सर्व धर्माप्रति
- शिवबाची ममता होती…
- उठ बहुजनां जागा हो
- शिवरायांचा पाईक हो
- 19 फेब्रुवारीलाच
- जिजाऊच्या पोटी
- दिव्य रत्न जन्मा आला
- माझ्या जाणता
- बहुजन प्रतिपालक
- शिवबा राजाची जयंती
- साजरी हो ………..
- राजेंद्र क. भटकर
- राजगृह अलंकार पार्क
- नवी वस्ती बडनेरा, अमरावती
- मो.क्र. ९०११३२७६९१