- आईं मला माफ
- जगावच वाटत नाही आता
- अग किती कर्शीन माझ्यासाठी
- तुझे ते कष्ट खरच पाहवत नाही आता
- जनमापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत
- जीवाला मारून अन् कष्टाचं ओझ
- तुझ्या माथ्यावर मला कमी करायचं आता
- माफ कर आई खरच जगवा वाटत नाही आता
- मला शिकवलं तू
- अन् माझ्या पायावर तू उभ केलस
- किती त्रास सहन केला असेल
- तुझ मात्र तुलाच कळलस
- इतकं सर्व असूनही माझ्या लग्नाला
- आपल घर गहाण ठेवलस
- का तू इतकं सहन करते
- का तू रोज माझ्या सुखासाठी लढतेस
- आई मुलगी देऊनही
- का ग हे पैसे ही मागतात
- त्यांना नाही का ग मुली
- का दिसून ही आंधळ्या सारखे वागतात
- तू कधी पायात पैजण घालते नाही
- आणि नाही बाबांनी नवीन कपडे घेतले
- पण माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून
- तू नवऱ्या मुलाच्या आई वडिलांना
- नवीन कपडे घेतलेस का?
- इतकं तू प्रेम करतेस माझ्यावर
- पण इतकं देऊन सुद्धा
- त्यांना मी नकोय ग
- हवंय त्यांना हुंडा
- माझ्या सारख्या किती तरी मुली
- या विचाऱ्याने आत्महत्या करतात
- पण बघन आईं त्या लोकांना
- अग थोडा ही फरक पडत नाही
- प्रतिक्षा मांडवकर
- यवतमाळ
- (Images Credit : Youtube)