• Fri. Jun 9th, 2023

सर्वांना सामाजिक न्याय हवा

    * पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण

    हैदराबाद : अकराव्या शतकातील भक्तीमार्गीय संत रामानुजाचार्य यांची मूर्ती भारताची प्राचीन ओळख असून सर्वांना सामाजिक न्याय हवा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकराव्या शतकातील भक्तीमार्गीय संत रामानुजाचार्य यांच्या २१६ फूट उंच पुतळ्याचे अनावरण झाले. त्यांच्या हस्ते हैदराबादमधील पटट्णसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या खास तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याच्या संस्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करण्यात आले.

    हैदराबादमधील पटट्णसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यानंतर संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

    पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ही मूर्ती ११ व्या शतकातील भक्ती शाखेचे संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे. ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांच्या मिर्शणाने बनलेली पंचधातू आहे. हा बैठक स्थितीतील पुतळा जगात सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा पुतळा ५४ फूट उंच अशा भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजीटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे. रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याची कल्पना रामानुजाचार्य आर्शमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे. या कार्यक्रमादरम्यान संत रामानुजाचार्य यांच्या जीवन प्रवास आणि शिक्षणावरील सादरीकरण मॅपिंगचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी दिव्य देसम च्या १0८ कोरीव मंदिरांनाही भेट दिली.

    रामानुजाचार्य हे महान सुधारक होते. ज्यांनी १ हजार वर्षापूर्वी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला. रामानुजाचार्य यांचा पुतळा म्हणजे समानतेचा पुतळा आहे. त्याचे अनावरण बुधवारपासून १२ दिवस असणार्‍या रामानुज सहस्त्राब्दी समारोपप्रसंगी केले जाणार आहे. वैष्णव संत रामानुजाचार्य यांची एक हजारव्या जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये २ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपयर्ंत १ हजार ३५ कुंडांतून १४ दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जाणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *