Skip to content मनी चिंतुनि कुल स्वामीनीला
भवानी मातेला केदारेश्वराला
सह्याद्रीच्या डोंगर द-यांला
किल्ले महाला दगड धोंड्याला
महाराष्ट्राच्या मराठी या भुमिला
आऊसाहेब ,शिवाजी शूर राजाला
कथा सांगतो संभू बाळाची जी जी
हुताशनी पौर्णिमा होळीचा सण
चंद्र बघे शौर्य सारे मनी हसून
आंब्याच्या डहाळ्या होळी सजवून
पोळीवर ताव मावळ्यांनी मारून
हलगी कडाडे मनी रंग भरून जी जी
राजे संभूसह होळीस आले हाssss
बाळाजी चिमणाजी मोरोपंत नेताजी
फिरंगोजी येसाजी केदारजी सारी
आऊसाहेब संभूबाळ दिसतयं भारी
राजानी पेटता दिवटा हाती घेऊनि
नमस्कार केला होळीस सारे मिळुनि
हर हर महादेव गर्जे सारे मावळे
होळी पेटली लाल लाल ते अंगार
पेटत्या होळीत नारळ अर्पियले
नारळ जळण्याआधी काढण्या सरसरले
मावळ्यांनी केलं रिंगण भोवतीनं
एकेक हात घालू लागला अग्नीत
होळी पेटली लाल सरले सारे मागे
जळणारी लाकडे फटफट बोल बोले
हर हर महादेव जयघोष सह्याद्रीत
होळी उदराचं दान द्यायला नाही तय्यार
संभू गरजले व्हा बाजूला आम्ही काढतो
सर्वांच्या भुवया वर गेल्या थरथरले सारे
झेप घेतली चित्यासमान सर्व भयभीत
जै भ s वानी ! उंच उसळी उडी घेतली
अग्नीत घालुनिया असा झट्कन हात
नारळ काढले संभूनी एका झटक्यात
मराठ्याचे राजे झाले तय्यार जी जी
बोला हर हर महादेव हर हर महादेव
Post Views: 35
Like this:
Like Loading...