• Thu. Sep 21st, 2023

शासन आपल्या दारी उपक्रमातून वंचितांच्या समस्या सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध

    यवतमाळ : शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जातीचे दाखले, रेशन कार्ड, ओळखपत्र, विविध योजनेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दुर्गम भागातील आदिवासी पोड व पारधी बेड्यावरील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये व सर्वांचा विकास व्हावा या हेतूने ह्यशासन आपल्या दारी यासारख्या उपक्रमातून प्रशासन आपल्या जवळ पोहचून आपल्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    यवतमाळ तालुक्यातील महसुल मंडळ कापरा (मे) येथे तहसिल कार्यालय यवतमाळ यांचे वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. या शिबीरात पारधी समाज बांधवाना जातीचे दाखले, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पांदण रस्ता अतिक्रमण निष्कासन, सात-बारा फेरफार वाटप, कृषी साहित्य, संजय गांधी निराधार व र्शावणबाळ योजने बाबत मंजुर प्रकरणातील प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी येडगे यांचे हस्ते कापरा ते सावरच्या पानंद रस्त्याचे भुमीपूजन व सनी कापरेकर यांचे शेतामध्ये रब्बी पिकाबाबत ई-पिक पाहणीचे प्रशिक्षण देण्यात आले. या समाधान शिबीरामध्ये विविध विभागाचे कॅम्प लावण्यात आले होते.

    यवतमाळ वाईल्ड लाईन १0९८ लक्षगट हस्तक्षेप परीयोजना, मतदान नोंदणी निवडणूक विभाग, एकात्मीक महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान, संजय गांधी निराधार योजना, कृषी विभाग, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग डिमायन्स फाऊन्डेशन अंतर्गत शेतकरी उत्पादक संघटना, उत्पादक कंपनी व वैद्यकीय महाविद्यालय तर्फे रक्तदान व लसिकरण कॅम्प व आधार अपडेशन कॅम्प व आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी विविध योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले. तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी प्रस्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार राजेश कहारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात सरपंच अनिता ढोले, मंडळ अधिकारी व्हि. डब्ल्यु. बकाले, तलाठी निशा उईके, ग्रामसेवक किशार जिवतोडे, संजय निबोरकर, प्रविण सोयाम, राजु महाजन, अमर शेंडे, केशव गायकी, मोहन तराडे, यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन व पर्शिम केले. तसेच जि.प.प्राथमिक शाळा कापरे येथील मुख्याध्यापक विनोद डाखोर व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. यावेळी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे, रिलायन्स ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,