ठाणे : मुरबाड तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व शरद टोहके यांच्या पहिल्याच कथासंग्रहांचे प्रकाशन प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मान्यवर अभिनेता विकास महाजन, रंगकर्मी सुधीर चित्ते, लेखक मोहन पाटील , कवी नवनाथ रणखांबे, हास्य कवी दीपक आंबटकर, जेष्ठ साहित्यीक गिरीश कंटे, शहीद भाई कोतवाल चित्रपटाचे दिग्दर्शक एकनाथ देसले , शरद टोहके यांचे कुटुंब आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Contents hide
शरद टोहके हे लेखणासोबत अभिनय सुद्धा करतात त्यांनी झी मराठी वरील स्वराज्य रक्षक संभाजी, सोनी मराठी वरील आनंदी हे जग सारे, स्टार प्रवाह वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकांमध्ये अभिनय केला असून मराठी आणि हिंदी शॉर्टफिल्म मध्ये अभिनय केला आहे . त्यांनी गीत लेखन आणि लघुपट लिहिले आहेत. सर्वधर्म कलाग्रुप मुरबाडच्या माध्यमातून टीम टेन मुरबाड या युट्युब चॅनेल वर त्यांनी लिहिलेल्या शॉर्टफिल्म बघायला मिळतात. एका पानाच्या टपरीवर आपला उदरनिर्वाह करून, कला जोपासून लेखण करतात . असे यावेळी मान्यवरांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत माळी यांनी केले तर सुत्रसंचालन भालचंद्र गोडांबे यांनी केले.