• Mon. Jun 5th, 2023

वचन…

    आज वचन द्यायचे
    मज माझिया देशाला ।
    रक्त सांडणार माझे
    सदा देश रक्षण्याला ।।
    माझ्या शब्दाने कोणाला
    कधी दुखविणे नाही ।
    जना आनंद द्यायचे
    कुणा फसविणे नाही ।।
    माझ्या होणाऱ्या पत्नीस
    आहे द्यायचे वचन ।
    तिचे अवघ्या जगती
    प्रिय असेल वदन ।।
    माझ्या पालकांना कधी
    नाही दुःखात ठेवणे ।
    मज त्यांच्या सुखासाठी
    आहे देह झिजवणे ।।
    मातृभूमी प्रिय मज
    जिणे गुणगान गात ।
    सदा माणुसकीसाठी
    पुढे असणार हात ।।
    माझ्या कर्तव्याशी सदा
    राहणार प्रामाणिक ।
    अधिकार मिळविण्या
    नाही मागणार भीक ।।
    शक्य तेवढे प्रयत्न
    माझे मुलं घडविण्या ।
    त्यांना शिक्षणामधून
    माणुसकी दाखविण्या ।।
    -अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी
    ता.दारव्हा, जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *