• Sat. Jun 3rd, 2023

लोकशाही पंधरवाडा मतदार जनजागृती अभियान निमित्त ऑनलाइन वेबिनार

    पिंपळखुटा/स्वाती इंगळे

    श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे लोकशाही पंधरवाडा मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात आले आहे.त्याच पर्वावर दि.५फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने”लोकशाही बळकटीसाठी युवाशक्तीची भूमिका” याविषयावर ऑनलाइन वेबिनार घेण्यात आला.या वेबिनारला छगनराव भुजबळ कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरा बु.ता.मेहकर जिल्हा बुलढाणा यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

    तत्पूर्वी दि २५ जानेवारी रोजी “राष्ट्रीय मतदार दिवस” विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.यानिमित्त ऑनलाइन वृक्तत्व स्पर्धा तसेच मतदार जनजागृती पर स्लोगन उपक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष मुरे होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुषमा थोटे प्रा.सुषमा कावळे प्रा. विजय कामडी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश इंगळे यांनी उपस्थिताना शपथ दिली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरानी लोकशाही बळकटी साठी मतदार जनजागृती कशी आवश्यक आहे तसेच युवक मतदार म्हणून रासेयो स्वयंसेवक युवकांनी पुढाकार घेण्यासंदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले.यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्याचे अभिनंदन तसेच पुरस्कृत करण्यात आले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेश इंगळे यांनी तर डॉ.मेघा सावरकर यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *