अमरावती : महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Contents hide
संबंधित विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. विद्यार्थ्यांच्या लॉगिन त्रुटी पूर्ततेसाठी सेंड बॅक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. त्यानुसार तत्काळ संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.