• Sun. Jun 4th, 2023

मज रोखता न आले

समजावता न आले , माझ्या मनास थोडे

मज रोखता न आले ,त्या आसवास थोडे
सोडून माय गेली ,तान्ह्या पिलास जेव्हा
मज बांधता न आले ,त्या पावलास थोडे
झाले हजार तुकडे , जेव्हा स्वप्नफुलांचे
मज सांधता न आले, त्या काळजास थोडे
गाळू नकोस अश्रू , अवकाळ पावसाचे
वादे तुझे कळू दे , सा-या जनास थोडे
जे सांगतात येथे , अश्रूस भाव नाही
मज जाणता न आले,त्या मानवास थोडे
तेजीत भाव आहे , खोटेपणास येथे।
पण बोलता न आले, मज पामरास थोडे
देशात अर्थ होते , जर लाख साठलेले
का वाटले न त्यानी , त्या शोषितास थोडे
अरुण विघ्ने

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *