• Mon. May 29th, 2023

पिंपळखुटी चेकपोस्टवर १२ टन गोमांस जप्त

    * पांढरकवडा पोलिसांची कारवाई, मुद्देमालासह ट्रकचालकास अटक

    पांढरकवडा : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरून मोठ्या प्रमाणात गो तस्करी केली जाते, आता तर तस्करांनी नवीन शक्कल लढवितांना गोवंश मास तस्करी सुरू केली आहे. सोमवारी अशाच तस्करांच्या मुसक्या आवळतांना पांढरकवडा पोलिसांनी १२ टन गोवंश मास नागपूरवरून हैदराबादकडे घेऊन चाललेल्या एका ट्रकचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात यश मिळविले व आरोपीस अटक केली.

    पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्र. एम एच ४0 बी एल ५९९१ मध्ये गोवंश मास असल्याची माहिती ठाणेदार जगदीश मंडलवार यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी पांढरकवडा टोल टॅक्स वर सापळा रचला. परंतु पोलिस बघताच ट्रक चालकाने ट्रक पलटून नागपूरमार्गे पळू लागला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून उमरी येथे गावकर्‍यांच्या मदतीने ट्रक पकडण्यास यश मिळविले. सदर ट्रकमधून पोलिसांनी २४ लाख रुपये किंमतीचे बैल व मशीचे १२ टन मास, १0 लाख रुपये किमतीचा ट्रक, २ मोबाईल व रोख ३२00 रुपये असा एकूण ३४ लाख ८ हजार २00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पी एस आय दुर्गाप्रसाद मिर्शा यांच्या फिर्यादीवरून आरोपी शहेजाद नवाब कुरेशी (४२) रा. नागपूरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली थानेदार मंडलवार यांच्या नेतृत्वात पांढरकवडा पोलिसांनी केली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *