• Fri. Jun 9th, 2023

गुरु रविदास मानवतावादी संत – प्रा अरुण बुंदेले

अमरावती : “‍गुरू रविदास यांची समतावादी, बुद्धिवादी विचारधारा होती. मनुष्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले उपाय राज्यसत्ताच करु शकते या विचारांचे ते प्रचारक होते. विषमतावादी समाजव्यवस्थेला आव्हान देण्याचे धैर्य त्यांनी दाखविले .मनुष्याच्या गुणवत्तेनुसार त्याला सन्मान मिळाला पाहिजे ही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती .” हिल मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही । फूट बडी माची तो देश नष्ट हो जाई ॥” या दोह्यात गुरू रविदासांनी आपसात भांडण तंटे करु नका ,मतभेद वाढवून फूट पडू देऊ नका ,असे सांगितले आहे. गुरू रविदास मानवतावादी संत होते .समाजमनाला गतिमान, परिवर्तनवादी ,विज्ञानवादी, मानवतावादी बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला,असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी केले .

ते सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश भागवतकर यांनी आयोजित केलेल्या श्री संत शिरोमणी गुरु रविदास जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
 केवल कॉलनी ,अमरावती येथील आयोजक श्री गणेश भागवतकर यांच्या गृह क्षेत्री दि. १६ फेब्रुवारी २०२२ ला शासनाच्या शासकीय कोरोना नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या श्री संत गुरु रविदास जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .पुरुषोत्तम वनस्कर (ज्येष्ठ समाजकार्यकर्ते ),प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले (समाजप्रबोधनकर्ते) प्रमुख अतिथी मा.अनिल भागवतकर(अध्यक्ष, श्री संत गुरु रविदास जीवन विकास बहुऊद्देशीय संस्था ,अमरावती ) मा.रमेशराव भटकर, मा.उत्तमराव इसाळकर ,मा कृष्णा मोहोकर ,
मा.गणेश भागवतकर ,मा.संजय खंडारे ,मा.दिनेश भागवतकर ,मा. सुखदेव नाथे होते .सौ कविता भागवतकर , चि. सक्षम भागवतकर व समाजबांधवांची उपस्थिती होती.
 सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
प्रा. अरुण बुंदेले यांनी “संत रविदास ” या स्वरचित अभंगाचे मधुर आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
 अध्यक्ष मा. पुरुषोत्तम वनस्कर यांनी ” गुरु रविदास यांनी समाजाला एकतेने राहण्याचा संदेश दिला. .पराधिनता पाप असल्याचे त्यांनी सांगितले .समतेच्या राज्याची त्यांनी कामना केली .त्यांच्या या विचारांचे आज आचरण केल्यास समाज व देशाची फार मोठी प्रगती होईल , असे त्यांनी प्रतिपादन केले .”
प्रमुख अतिथी मा. अनिल भागवतकर यांनी, गुरू रविदासांची स्वाभिमान,स्वावलंबन विषयक विचारधारा आणि सामाजिक विचारधारा आज समाजाने आचरणात आणण्याची आवश्यकता प्रतिपादन केली .
चि. शिवम भागवतकरने आपल्या प्रास्ताविकात ” मनही पूजा मनही धूप। मनही सेऊ सहज सरूप ॥ या दोह्यात संत रविदासांनी
मनापासून केलेल्या कर्माचे मोल सांगितले आहे . त्यांनी मनाविषयी असलेले संत रविदासांचे विचार
व्यक्त केले.
प्रमुख अतिथी श्री सुखदेव नाथे यांनी गुरु रविदास यांच्या कार्यावर प्रकाश टाकून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री संजय खंडारे व आभार श्री कृष्णा मोहोकर( सामाजिक कार्यकर्ते) यांनी मानले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *