कै.लक्ष्मीबाई रामकृष्णजी खाडे “शब्दांजली”

  दु :ख होई मनी।
  श्रद्धांजली दिनी॥
  गुंफितो चरणी ।
  शब्दांजली ॥१॥
  लक्ष्मीबाई एक।
  सज्जन शालीन॥
  सर्वांचा सन्मान ।
  करितसे ॥२॥
  मुलांना मुलींना।
  सुसंस्कार दिले ॥
  मन घडविले ।
  तयांचेच॥३॥
  लक्ष्मी आईचा हा।
  स्वभाव तो नम्र ॥
  वर्तन विनम्र ।
  जीवनात॥४॥
  दररोज होई।
  मधुर स्मरण॥
  उदास हे मन।
  सर्वांचेच ॥५॥
  स्मृतींना नमन।
  आज हे स्मरण ॥
  होई क्षण क्षण ।
  लक्ष्मीबाई ॥६॥
  करद्वयांनी मी।
  नमन करितो ॥
  मनाने वाहतो।
  श्रद्धांजली ॥७॥
  -प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
  रुक्मिणीनगर ,अमरावती.
  भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.