• Sun. Jun 11th, 2023

कापूस उचलावा त्याप्रमाणे टायगर र्शॉफने सहज उचलले २२0 किलोचे वजन !

    मुंबई : अभिनेता टायगर र्शॉफ याचा फिटनेसचं चाहते, सहकलाकार भरभरून कौतुक करत असतात. टायगर सोशल मीडियावर मस्क्युलर बॉडीचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेत वर्कआऊट करायला सुरुवात केली आहे. अलिकडेच टायगरने डेडलिफ्ट करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टायगरने १00-१५0 नाही तर चक्क २२0 किलोचे वजन उचलले आहे! हे पाहून सोशल मीडियावरील युझर्स हैराण झाले आहेत.

    टायगरने इन्स्टावर काही सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तो २२0 किलोचं वजन अगदी सहजपणे उचलताना दिसत आहे. हे वजन तो एक- दोन किलोची वस्तू उचलावी इतके सहजपणे उचलत आहे. टायगरचा हा व्हिडिओ पाहून चाहते, युझर्स आश्‍चर्यचकीत झाले. याशिवाय टायगरने इनस्टाग्रामवर त्याचे बायसेप्स आणि अँब्स दाखवणारा देखणा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते कमालीचे भारावून गेले. टायगरच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेन्ट केल्या.

    दिशा पाटनीचा ही जलवा

    केवळ टायगरच नाही तर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पटानी ने देखील तिचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये ती जीम ट्रेनरबरोबर ब्लॅकफ्लिप आणि कार्टव्हील करताना दिसत आहे. दिशाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर टायगरने ह्यक्लीन असे म्हणत इमोजी शेअर केला आहे. टायगर र्शॉफच्या कामाबद्दल सांगायचे तर तो हिरोपंती २ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत क्रिती सेनन आहे. याशिवाय तो गणपत सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो नुताच लंडनला जाऊन आला.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *