- भिन्न धर्मियांनी आता
- रंग वेगळा वाटला
- माणुसकी धर्म मात्र
- पुरा पुरा हो बाटला
- धर्म रक्षण करण्या
- स्वधर्माची असो चाड
- पर धर्म द्वेषापोटी
- नका करू हल्ला भ्याड
- जरी भिन्न धर्म सारे
- शिकवण देती एक
- नको संघर्ष कदापि
- मार्ग धरावा तो नेक
- रंग वेगळे वेगळे
- वेगळ्याच चालीरीती
- बंधुतेची कायमच
- जोडा अतूट हो नाती
- धर्मरुप पेहराव
- शोभे तयाशी सुंदर
- नको बंधने उगाच
- असो हिजाब पदर
- धर्म जाती पंथ असा
- नका करू भेदाभेद
- पेरलेच कोणी विष
- विचारास द्यावा छेद
- सारे रंग एक होता
- मिळे शांतीचे प्रतिक
- नाव धर्माचे घेऊन
- करू नका अगतिक
- ठेवा करारी तो बाणा
- मूळ धर्माचे ते जाणा
- मानवता धर्म माना
- जगी ऐक्य भाव आणा
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता.बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227