Recent in Technology

Advertisement

Breaking News

बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अमरावती : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुर्ला ता.झरी जामनी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता 8 वी ची विध्यार्थीनी ,बालकवयित्री कुमारी स्नेहल बाबाराव मडावी तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र मेश्राम , सदस्य श्री अरविंद घोरपडे, मंगेश ढोरे , समीक्षा राजगडकर, कविता कोडापे, सौ.अर्चना येडमे,इत्यादी उपस्थित होते. *या प्रसंगी मराठी भाषा संवर्धन संस्था ढाणकीच्या वतीने शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींना  लेखन साहित्य देऊन गौरविण्यात आले.* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मुलींनी भाषणे दिलीत, व गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश पेंढरवाड यांनी केले. प्रास्ताविक श्री राजेश मेश्राम सरांनी व आभार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री रमेश बोबडे सरांनी माणलेत. कार्यक्रमाला विध्यार्थी व पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code