Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

पंधरा ते अठरा वयोगटातील कोविड लसिकरणास उत्फुर्त प्रतिसाद

    अमरावती : जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या कोविड लसिकरणाकरीता वय पंधरा ते अठरा वयोगटातील लाभार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला असुन अवघ्या चार दिवसामध्ये बारा टक्के लसिकरण पूर्ण झाले आहे.

    प्रत्येक गावामध्ये सदर लसिकरणाचे आयोजन होत असून मोठ्या प्रमाणावर युवा पिढीचे सहकार्य लाभत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोविडची तिसरी लाट बघता या वयोगटातील मुलामुलींना लस देणे अनिवार्य होते.

    जिल्ह्याला एकूण 1,49,000 चे पंधरा ते अठरा वयोगटातील उद्दिष्ट असून लसिकरण सतरा हजार तिनशे वीस दिनांक 5.01.2022 पर्यंत लसिकरण झालेले आहे. प्रत्येक शाळेतील लसिकरण अत्यंत चांगल्यारितीने पार पडत असल्याचे चित्र पुढे येत आहे. सध्या ओमिक्रॉनचे रुग्ण जिल्ह्यात आढळले असून प्रत्येकाने आपल्या स्वत:ला संरक्षित करण्याकरीता मास्क लावणे, अंतर ठेवणे, हाथ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे जरुरी आहे, तरच आपण या कोरोनासारख्या महामारीवर मात करु शकू. आपली हयगय हेच आपले संकट आहे. आपला परीवार, समाज, गांव, शहर व देशाला सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने सगळ्यांनी मिळून या महामारीवर मात करावी लागणार आहे.

    आपले कुटुंब आपली जबाबदारी हाच मंत्र प्रत्येकाने या कोरोना काळात बाळगायचा असून जी व्यक्ती लसिकरणाला घाबरते किंवा लसिबाबत गैरसमज केलेला असेल अशांना गावातील अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समाधान करावे जेणे करुन तो लस घेण्यास स्वत:हून तयार होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी पनवनी कौर यांनी संपूर्ण जनतेला केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code