Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

भातकुलीच्या निरंजनला केरळातून आणणार पालकमंत्री अमरावतीत

    अमरावती : केरळ मधील थिसुर येथील मनोवैज्ञानिक केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या भातकुलीच्या तालुक्यातील खारतळेगावं च्या निरंजन रामेकर या तरुणाला पुन्हा अमरावतीत घेऊन येण्याचा निर्धार जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यासाठी येथील मूळ वैज्ञानिक केंद्रातील डॉक्टरांशी चर्चा करून निरंजनच्या परतीची व्यवस्थाही पालकमंत्र्यांनी केली आहे.

    अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे राहत असलेल्या निरंजन रामेकर या तरुणाला मानसिक आजार जडला. त्याने स्वतःच्या शेतातील पिके जाळल्यामुळे त्याच्या वडिलांनी संतापून पोलिसात तक्रार केली. निरंजन केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते. केंद्रीय कारागृहातून सुटका झाल्यानंतर निरंजन परस्पर नेपाळला गेला. नेपाळमधून काही महिन्यांनी तो पुन्हा घरी आला. मात्र पुन्हा एकदा तो घरातून गायब झाला. काही महिन्यांपूर्वी तो केरळ येथील थिसूर येथील मनोवैज्ञानिक केंद्रांमध्ये असल्याचे समजले. त्याच्यावर सध्या मनोवैज्ञानिक केंद्रांमध्ये उपचार सुरू असून तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्याला परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची आज भेट घेतली.

    यावेळी पालकमंत्र्यांनी मनोवैज्ञानिक केंद्रातील डॉक्टर सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा करून निरंजनला पुन्हा आणण्याची परवानगी घेतली. तसेच निरंजनच्या कुटुंबियांना केरळात जाऊन निरंजनला परतण्याची सर्व व्यवस्थाही पालकमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे भातकुलीचा निरंजन पुन्हा एकदा आपल्या मातीत परतणार आहे. याबाबत निरंजनच्या कुटुंबियांनी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code