मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. तो आपल्या पनवेल इथल्या फार्महाऊसमधले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. लॉकडाऊनमध्येही सलमान त्याच्या या पनवेल इथल्या घरामध्ये राहत होता. तिथल्या एक शेजार्याविरोधात सलमानने तक्रार दाखल केली आहे.
सलमान खाननं त्याच्या शेजार्याविरोधात म्हणजेच केतन कक्कर विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्याने म्हटले आहे की, सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे. केतन कक्कर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या