Header Ads Widget

तो आणि तू सारखेच

  तो ही आला आणि गेला
  लाखो अस्थी देऊन गेला
  हा ही तसाच असल्याचे
  सुतोवाच मात्र करून गेला
  जा आता तुही विश्राम कर
  मलाही स्वल्पाराम घेऊ दे
  पोटाची कनगी भरण्यासाठी
  भविष्याचा थोडा वेध घेऊ दे
  तू आलाच आहेस तर चल
  दोघेही सोबत प्रवास करू
  एकमेकांचा हातात हात घेत
  सुख दुःखांचा डोंगर फिरू
  तू एक पाऊल पुढे टाक
  मी एक पाऊल टाकतो
  दिवस रात्रीच्या श्रमाचा
  काळ हिशोब मागतो
  गाईच्या गोठ्यातून मी येतो
  क्षितीजापल्याडून तू ये
  भाकरीचा चंद्र शोधणा-या
  उपासी वासराची पूस घे
  अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या