- छोटासा बाळ येऊन
- मला एकदा म्हणाला
- सांग ना मला आई
- मी कधी होणार शहाणा
- तुम्ही मोठी माणसं
- किती मजा करता
- मनासारखं वागता
- मी मनासारखं जगता
- तुम्हाला कधी कुणी
- रागवत नाही
- काही खा काही प्या
- फरकच पडत नाही
- आमची मात्र सारी
- अर्धवटच स्वारी
- याच्या त्याच्या कुशीत
- नी पाळण्यात लोळी
- मुटू मुटू बघायचं
- भरवलं ते खायचं
- शि,सू लागली तर
- मोठ्याने रडायचं
- किती किती असतो
- आमच्या मागे ताप
- प्रत्येकाच्याच तालावर
- आमचा असतो नाच..
- सौ शितल राऊत
- अमरावती
0 टिप्पण्या