- वंदन राजमाता माँसाहेबांना।
- नमन करू या तव चरणांना ॥धृ॥
- जिजाऊ शिवबांची गुरू नी माता।
- राजघराण्याची थोर राजमाता।
- शिवरायांची विवेकी वीर माता।
- जिजाऊ सत्कर्माची करू अर्चना।१।
- शिवराय संभाजींची मार्गदाता।
- ह्रदयी वत्सलता नि मानवता।
- सुस्वराज्याच्या अभ्युदयाची चिंता।
- मातेच्या कार्याची करू आराधना।२।
- धैर्यशील- न्यायप्रिय राजमाता।
- माँसाहेबांच्या स्वराज्यात समता।
- आदर्श प्रशासनाची एक दाता।
- स्मरणकरू जिजाऊंच्या स्मृतींना।३।
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर,अमरावती
- भ्र.ध्व.८०८७७४८६०९
0 टिप्पण्या