Recent in Technology

Advertisement

Breaking News

त्यालाच आयुष्य जगता येईल

  आयुष्य जगत असताना
  असंख्य रस्त्यांना तोंड द्यावे लागते
  कधी रडत तर कधी हसत
  हे सुंदर आयुष्य जगावे लागते
  कधी निराशा, तर कधी अपयश
  कधी परिस्थिती तर कधी यश
  यांचं स्वीकार करत
  सतत स्वतः चे अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्याशी लढत राहावे लागते
  कदाचित यालाच आयुष्य म्हणता येईल आणि
  जो या सर्व गोष्टीचा स्वीकार करून समाधानी असेल
  त्यालाच या आयुष्याच मनसोक्त आनंद घेता येईल
  अनोळख्या वाटा अनोळखी लोक
  आणि कधी न पाहिलेले संकट
  अचानक समोर येताना
  त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य
  माणसात यायला हवे आणि
  त्यालाच हे सुंदर आयुष्य जगता येईल
  आयुष्याचे गणित कुठल्या पुस्तकात सुटणार नाही
  त्याला सोडवण्यासाठी मात्र
  प्रत्येकालाच आयुष्याच्या रणांगणात उतरावे लागेल
  आणि त्यालाच हे सुंदर आयुष्य जगता येईल
  -प्रतीक्षा मांडवकर
  पिंपळगाव यवतमाळ
  8308684865

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code