Header Ads Widget

अबोल महिलांना बोलते करणारी साविञी एक ज्ञानज्योती होती-शिवा प्रधान

    अमरावती : सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रीयेत साविञिच्या लेखणिने एक सामाजीक आदर्श तत्काळात निर्मान केला त्यांचा काव्यफुले हा काव्यसंग्रह खुप गाजला होता त्यातील उंची गाठून त्यांच्या कवितेने साहित्याला नवा आयाम दिला नवकविता उदयास घालून कवितेच्या प्रांतात सुध्दा त्यांनी सामाजिक विचारधारा सत्याची विचारधारा आत्मसात करून सामाजीकतेच्या साहित्याला प्रेरणाच दिली आहे.

    स्ञि मुक्ती या सनातन परंपरेत नसून ती साविञीबाईच्या वास्तव विचारात प्रत्ययास येतांना दिसते 'सामाजिक क्रांती लढ्यात त्यांचे कार्य येथे अनमोव ठरले आहे महिलांच्या अन्यायाविरूध्द सनातनी मनूवादी व्यवस्थेतील असलेला असमतोल त्यांना वेळोवेळी डिवचत होता अशातही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही शेणमाती!दगड धोंडे या बुरसटलेल्या विवेकशून्य लोकांच्या या कृत्याला सामोरे जावे लागले.

    स्ञि शिक्षणाच्या या कार्यात त्यांनी त्रार न पत्करता हा लढा सुरूच ठेवला क्रांतीज्योती साविञीचा उदय म्हणजे नव क्षितिजावरील एक क्रांतीत्योदय होता त्या महीलासाठी एक फेमीनीष्ट होत्या.संघर्षशाली महान थोर विभूती होत्या त्यांचा शिक्षणाचा लढा हा भारतीय स्ञिलाच नव्हे तर जगातील स्ञियांना एक प्रेरणास्ञोत बनून राहील यात शंका नाही.

    शिक्षणान महीलांना उजागर करून क्रांतीज्योती साविञीने अबोल महीलांना बोलते केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून महिलांना समानतेची,हक्काची,शिक्षणाची,समतेची ,सर्वांग न्यायाची सारखी हक्कमूलक भागीदारी देवून भारतातील समस्त महीलांना सन्मानीत केले क्रांतीविर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला समर्थ साथ देवून त्यांचा सामाजिक लढा यशस्वी करन्यात त्यांचा अनमोल वाटा विसरून चालणार नाही 191 व्या क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परिसर अमरावती द्वारा आयोजीत कार्यक्रमात बोलतांना आंबेडकरी साहित्तिक ,विचारवंत मा शिवा प्रधान यांनी अध्यक्षीय भाषनात वरील प्रतिपादन केले.

    प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा. ज्योती बोरकर यांनी उपस्थित सावित्रींना क्रांत्रीज्योती सावित्रीच्या जिवनकार्यावर उद!बोधक माहीती दिली जिवनाचा खडतर प्रवास यांनी मांडुन सावित्रींनी सोसलेल्या यांतनाची झळ वआपण यांच्यामुळे शिक्षणातबदल करु शकतो असे महत्व पूर्ण प्रतिपादन केले उपासक संघाचे सचिव मा.उमेश शहारे यांनी प्रस्तावनेतुन छान मांडनी करुन प्रसंगी त्यानींही क्रांत्रिज्योती सावित्रिबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकली.कार्यक्रमात मंचावरप्रति सावित्रि प्रतिरुपात उपासक संघाच्या उपासिकांनी पेहराव करुन छान रंगत भरली. यामध्ये उपासिका अनिता रोडगे,प्रतिभाताई प्रधान,सविता भगत कोथळकरबाई या मंचावर होत्या.यासर्वांनी सावित्रिबाई विषयी मनोगत व्यक्त केले तसेच नदिंनी वरघट रजनी सरदार,वरठेबाई,खाकसेबाई, वर्षा गाडगे कोमल ,मनीषा दूर्यौधन ज्योति गजभिए या सर्व सावित्रिंचे स्वागत पुष्प गुच्छा देवून ज्योति बोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रारंभी दिप प्रज्वलन मा. शिवा प्रधान आणि मान्यवंरानी करुन अभिवादन क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले याच्यां प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

    बुध्दवंदना सुर्यभान बनसोड यांनी सामुहिकतेमध्ये घेतली सुनिता रायबोले,पुष्पा दंदे यांनी गीत सादर केले तसेचज्योती गजभिये यांनी सावित्रिवर बोलतांना उपासकांना गंभीर बनवून सावित्रीविषयक मनोगत मांडले या बराच वेळ चालणार्या क्रांतीज्योती जंयती समांरभाचे अभ्यासपूर्ण संचालन सचिव उमेश शहारे यांनी करुन या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जि.एस. इंगळे यांनी केले. कार्यक्रमासाठी कृष्णा थोरात. आंनद ईंगळे ,डि.जि. वानखडे एस.बि खोब्रागडे,सुरेश वरघट,रामकृष्ण तायडे,राहूलसोमकुवर,मंसराज गजभिये प्रभाकर गाडगे, अवधुत गजभिये, सुर्यभान बनसोड, भानुदास प्रधान, गोपाळ मेश्राम, माला ताई, निरंजन नागदिवे, व्यकटेश खोब्रागडे किशोर तायडे, बापुराव गुळसुंदरे सुरेश तायडे, रामटेके,प्रभाकर गवई, संजय घरडे, डि.के. बागडे हिम्मतराव वरघट. ईत्यादिंनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या