Header Ads Widget

ट्राफी

    स्वप्नसुंदरी होऊन ट्राफी
    स्वप्नात येते हळूच घरी
    हात लावता, स्पर्श करिता
    उडुनी जाते अधांतरी
    व्यासपीठावर फोटो घेता
    मम हात हाती प्रेमे धरी
    कौतुकाने नाहुनी मी जाता
    हळूच हसे ती होऊन परी
    भोवती फेरा गुणीजनांचा
    शाल -पगडी हसे क्षणा
    आनंदे हर्षते मनात माझ्या
    उड्या मारीते टणाटणा
    शाल पगडीसह पुष्पगुच्छ तो
    जाऊन बसतो कोण्या दिशा
    ट्राफी हासुनी म्हणे मलाच हो
    तुझीच मी रे मोनालिसा
    बसतो दावीत इवला फोटो
    होऊनिया मी वेडापिसा
    विसरून जातो कविता माझी
    शोधीतो कागद, खिसा-खिसा
    ट्राफी बंद काचेच्या तुरुंगी
    धूळ माखुनी काळी काळी
    बातमी इवलीशी, घेतो पेपर
    पुसत बसतो हळूच जाळी
      निसर्ग,डोंगर, झाडीवेली
      पीकपाणी,माणसे, जित्राप
      नातीगोती पिंजते कविता
      ट्राफी दावी माझा प्रताप
      उरी कवटाळतो स्वप्नी ट्राफी
      विसरूनी जातो अवघे क्लेश
      मनी मोरपिसे गंधमकरंद
      स्वप्नातच फिरतो देशविदेश
      मुबारक उमराणी
      सांगली
      ९७६६०८१०९७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या