Recent in Technology

Advertisement

Breaking News

" माय सिंधुताई "

    भारतातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ,अनाथांची माय म्हणून अोळखल्या जाणाऱ्या ,पद्मश्री व डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासह ७५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या दि.४ जानेवारी ,२०२२ ला रात्री ८.१० वाजता अनंतात विलिन झाल्या. त्यांच्या निधनाने त्यांच्या अनाथ लेकरांसह संपूर्ण महाराष्ट्र दु:खसागरात बुडाला. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांनी अभंगरुपी वाहिलेली ही "शब्द श्रद्धांजली "वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

    - संपादक
    -----------------------------------------
    अनाथांची माय। गेल्या खूप दूर।
    अश्रुंचा हा पूर। आश्रमात॥१॥
    हजारो लेकरं। सांभाळले माई।
    माय बाप माई। अनाथांची॥२॥
    जगात या झाली। माऊली खरी तू।
    साऊली खरी तू। अनाथांची॥३॥
    आईची ही माया। वाटे आश्रमात।
    पेटविली वात। तिमिरात॥४॥
    झाली ही पोरकी। हजारो लेकरं।
    मायेचा आधार। हरपला॥५॥
    नि:स्वार्थी भावना। करताना कार्य।
    सोडले ना धैर्य । जीवनात॥६॥
    मनाला चटका। लाऊनिया गेली।
    निराधार झाले। दु:खमय॥७॥
    सातशे पन्नास। प्राप्त पुरस्कार।
    कार्याचा प्रसार। जगभर॥८॥
    सिंधुताईंना ही। शब्दांनी वाहिली।
    शब्द श्रद्धांजली । भावपूर्ण ॥९॥
    माईंना अर्पितो। शब्दांचे सुमन।
    करांनी वंदन। कोटी कोटी॥१०॥
    -प्रा.अरुण बा.बुंदेले,
    रुक्मिणी नगर,अमरावती.
    भ्र.ध्व.८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code