Header Ads Widget

माँसाहेब जिजाऊ स्वराज्याच्या दीपस्तंभ - प्रा.अरुण बु्ंदेले

  अमरावती : " स्फूर्ती,चेतना,प्रेरणा व मायेचा अखंड झरा असलेल्या जिजाऊंच्या नजरेत हिऱ्याचे तेज,ह्रदयात मायाआणि मनात समतेचाविचार होता.शिवरायांसारखा युगपुरुष घडविण्याचे महान कार्य माँ जिजाऊंनी स्वत:च्या शिकवणीतूनकेले.स्वातंत्र्य ,समता,बंधुता व न्याय या तत्त्वावर आधारलेले रयतेचे जनकल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ स्वराज्याच्या दीपस्तंभ होत्या."असे विचार प्रमुख वक्ते प्रा.अरुण बु्ंदेले व्यक्त केले.

  ते राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरुन बोलत होते. वऱ्हाड विकास,अमरावती वकै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान ,अमरावती तर्फे आयोजित शासनाच्या कोरोना निर्बंधाचे पालन करुन डाँ.अनिल सावरकर यांच्या निवासस्थानी दि.१२ जानेवारी २०२२ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रमुख वक्ते प्रा.अरुण बु्ंदेले ( कवी व लेखक),प्रमुख अतिथी डाँ.सुभाष वाढोणकर होते.अध्यक्ष ,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व श्री संत अच्युत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.श्री संत अच्युत महाराज हार्ट हाँस्पिटल व रिसर्च इन्टिट्युटचे अध्यक्ष डाँ.अनिल सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रा.अरुण बुंदेले ,डाँ.सुभाष वाढोणकर यांनी शाँल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.

  अध्यक्षीय भाषणात सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी "माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना सर्व गुणसंपन्न बनविले.त्यांच्यातील जिद्द,चिकाटी व ध्येयनिष्ठा वृद्धिंगत केली. त्यामुळे छ.शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले. माँसाहेबांचे कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत सर्वांना प्रेरणा देणारे व अनुकरणीय आहे." असे प्रतिपादन केले.

  सत्कारमुर्ती डाँ.अनिल सावरकर यांनी " माँ जिजाऊंच्या विचाराची समाजाला आज गरज असल्याचे प्रतिपादन केले.समाजातील दुर्बल व गोरगरीब जनतेला ह्रदयरोगापासून तसेच जन्मजात ह्रदयरोगापासून मुक्तता मिळविण्यासाठी श्री संत अच्युत महाराज हार्ट हाँस्पिटल मध्ये मोफत व अल्पदरात उपचार होतो.आजपर्यंत अनेक ह्रदयरोगी येथील उपचारामुळे ह्रदयरोगापासून मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डाँ.सुभाष वाढोणकर यांनी केले. याप्रसंगी डाँ.गणेश खारकर,श्रीराजेश सावरकर,आर्किटेक्ट श्री रमेश सावरकर,श्री किसनराव भोजने,श्री राजेंद्र देवळे,श्री गोविंद फसाटे यांनी डाँ.अनिल सावरकर यांना शुभेच्छा दिल्या.प्रा.अरुण बुंदेले यांनी "राजमाता जिजाऊ" हे स्वरचित वंदन गीत सुमधुर स्वरांमध्ये गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या