Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

ठिबक सिंचनासाठी शेतकर्‍यांना अनुदान

    मुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणार्‍या शेतकर्‍यांना पूरक अनुदान देण्याकरिता २00 कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदभार्तील शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.राज्यातील शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतक?्यांना खर्च मयार्देच्या ५५ टक्के व इतर शेतकर्‍यांना खर्च मयार्देच्या ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते. योजनेकरिता केंद्र शासन ६0 टक्के व राज्य शासन ४0 टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देते.

    राज्य शासनाने दिनांक १८ नोव्हेंबर २0२१ रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकर्‍यांना मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविणार्‍या शेतकर्‍यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतला. त्यानुसार प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍ांना मिळणार्‍या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकर्‍यांना मिळणार्‍या ४५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त ३0 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा रितीने सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना एकूण ७५ व ८0 टक्के अनुदान मिळणार आहे. सूक्ष्म सिंचन संच बसविणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याकरिता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे.

    या निधीतून सन २0२१-२२ या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकर्‍यांना पूरक अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.७५ टक्के व ८0 टक्के अनुदानाचा लाभ झाल्यामुळे शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लागणार्‍या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code