Header Ads Widget

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न- प्रा. वर्षा गायकवाड

    मुंबई : राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम यासंदर्भात पूरक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य करण्याबाबत अँमेझॉनने तयारी दर्शविली असून त्याची सुरुवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

    राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकायार्साठी ?मेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. यासंबंधी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी आमदार रोहीत पवार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, अँमेझॉन इंडियाचे संचालक सलीम मेमन, अँमेझॉन सीएसआरच्या प्रमुख मनिषा पाटील, फ्युचर इंजिनिअरचे प्रमुख अक्षय कश्यप, पब्लिक रिलेशन्स टीमच्या माधवी कोचर, लिडरशीप फॉर इक्विटीचे मधुकर बानुरी, पब्लिक पॉलिसीच्या स्मृती मिर्शा यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची मदत होण्यासाठी अँमेझॉन सहकार्य करणार आहे. याअंतर्गत राज्यात ४८८ आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण, संगणकशास्त्रातील कोडिंग लॅब, अँमेझॉनमार्फत देण्यात येणार्‍या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी, सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत २0२२ पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे या कामी अँमेझानचे सहकार्य लाभणार आहे.

    शालेय शिक्षण विभागामार्फत वर्ग डिजिटाईज्ड केले जाणार आहेत. यामध्ये देखील अँमेझॉनच्या सहकार्याची सुरूवात म्हणून मुंबईच्या धारावीमधील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील ७६९विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार असून नियमित अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

    हिंदी माध्यमिक शाळा (संत कक्कया शाळा इमारत) दादर, काळा किल्ला मराठी प्राथमिक शाळा, काळा किल्ला एमपीएस माध्यमिक, टी.सी.मनपा मराठी माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा उर्दू माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा इंग्रजी माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅब चे वितरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या