Header Ads Widget

शाळा आणि ओमीक्राॅनची भीती..!

  सध्या महाराष्ट्रात शाळा सुरु झालेल्या आहेत. प्रथम आठवी त्यानंतर पहिली ते चवथीच्या शाळा. पण ह्या शाळा सुरु करतांना कोरोनाचा भाऊ ओमीक्रान आला होता हे सर्वांना माहित होते. तो वाढणार होता हेही माहित होते. तरीही शाळा सुरु झाल्या. कारण शाळा केव्हापर्यंत सुरु करायच्या नाहीत. केव्हापर्यंत थांबावे यासाठी कधी ना कधी जबाबदारी घ्यावीच लागेल या उदात्त हेतूनं सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला. त्यातच कोरोनाचा भाऊ ओमीक्रान वाढला व नाईलाजानं शाळा बंद कराव्या लागल्या. आज मुंबई, पुण्यात शाळा बंद आहेत.

  मागील वर्षीही असंच झालं. ऐन हिवाळ्यातच शाळा सुरु झाल्या होत्या. त्यातच कोरोना पंधरा दिवसात एवढा वाढला की त्या कोरोनानं शाळा बंद झाल्यानंतरही तीन महिण्यापर्यंत एवढे बळी घेतले की म्हशानात जागाही नव्हत्या चिता पेटवायला. रांग लागत होती. ही गोष्ट काल्पनीक नाही तर सत्य आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न केला तर याला जबाबदार आपणच आहोत.

  आज कोरोना आहे. तो मंदीरातील गर्दीतून वाढत नाही. खानावळीतून वाढत नाहीत. वाहनाच्या गर्दीतून वाढत नाही. परंतू शाळेतून वाढतो. याला जबाबदार आहे शाळा. इतर ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळासोबत असतो. आपण मायबाप या नात्यानं आपल्या बाळाची सर्वतोपरी काळजी घेतो. परंतू शाळेत आपल्या मुलांची तशी काळजी घेतली जात असेल हे काही सांगता येत नाही. कारण अशाही काही शाळा या पृथ्वीवर आहेत की ज्या शाळेतील संस्थाचालक हे हेकेखोर आहेत. ते पैशासाठी शिक्षकांना त्रास तर देतातच. त्यांचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत असतो.

  शाळेचा प्रशासकीय घटक असतो तो म्हणजे मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाला पुर्ण अधिकार असतात. तोच सर्व शाळेतील कारभार चालवतो. पाहतो. कारण तोच शाळेचा सचिव असतो. शाळेला अनुदान मुख्याध्यापकामार्फत मिळत असतं. हे जरी खरं असलं तरी काही काही शाळेत मुख्याध्यापक वर्गाला केवळ रबरस्टँप म्हणून वापरले जाते. त्यातच त्या शाळेत त्या मुख्याध्यापकाला तो शाळेच्या दृष्टिकोणातून सर्वकष असला तरी पुरेसे अधिकार नसतात. तसं पाहता त्याला पुर्ण स्वरुपात अधिकार असले तरी तो ते अधिकार पुर्ण स्वरुपात वापरत नाही. तो संस्थाचालकाला सर्वेसर्वा समजतो. जो संस्थाचालक प्रशासकीय प्रमुख नसतो.

  हाच संस्थाचालक चांगल्या विचारांचा असेल तर तो मुख्याध्यापकाला सहकार्य करतो. काही संस्थाचालक असे सहकार्य करीत नाहीत. कारण त्या त्या शाळेत एकंदर शिक्षकांच्या वेतनावर काही टक्केवारीनुसार अनुदान मिळतं. तरीही तो संस्थाचालक शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम मागतो. अशी रक्कम शिक्षकांकडून न मिळाल्यास तो त्याचे शाळेतील मुख्याध्यापकाला तो पैसा वसूल करायला लावतो. परंतू जेव्हा या गोष्टी घडून येत नाहीत. तेव्हा मात्र संस्थाचालक बावचळतो व तो त्या मुख्याध्यापकालाच सहकार्य करीत नाही. प्रसंगी त्रासही देत असतो. कारण त्याला त्या शाळेत गोंधळच निर्माण करायचा असतो. पुन्हा असं की तो स्वतःला शाळेचा मालकच समजतो.

  संस्थाचालक हा शाळेचा मालक नसतोच. हं जागा त्याची असते. परंतू त्या जागेचा तो किराया घेतो.शाळा ही चालवायची असेल तर त्याला एक संस्था स्थापन करावी लागते. जी संस्था सार्वजनीक विश्वस्त मालमत्ता असते. ती काही एकट्या संस्थाचालकाची नसते. ज्यावेळी नोंदणी होते. त्यावेळीच लिहून द्यावं लागतं की मी माझी जागा संस्थेसाठी देत आहे. त्या संस्थेला त्या संस्थाचालकाला स्वतःच्या मर्जीनं हटवता येत नाही.

  शाळा आणि कोरोनाचा संबंध असा की ज्या संस्थेतील शाळेत संस्थाचालकाला असा शिक्षकांच्या वेतनातून पैसा मिळत नाही. त्या ठिकाणी त्याला शाळेत सोय करण्यासाठी पुरेसे शाळेसाठी अनुदान मिळत असूनही तो त्या शाळेत पुरेशा व्यवस्था करीत नाही. काही काही शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते. काही काही शाळेत शौचालयेही नाहीत. त्यातच विद्यार्थ्यांचे जेवन झाल्यावर त्यांना शाळेत हात धुवायला जागा नाही. त्यातच काही काही शाळेत तर विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थाही नाही. कोरोनाचे निर्बंध व नियम लक्षात घेवून शाळा ह्या भरवायच्या असतांना काही काही संस्थाचालक मुख्याध्यापकामार्फत शिक्षकांकडून त्यांच्या वेतनातील पैसा येत नसल्यानं त्या मुख्याध्यापकाचा गोंधळ प्रशासनाला दिसावा म्हणून शाळेची व्यवस्था लावण्यासाठी पुरेसे सहकार्य करीत नाहीत. कोरोनाचे निर्बंध लक्षात घेवून शाळा ही दोन पाळीत भरवायची असूनदेखील असे संस्थाचालक शाळा एकाच पाळीत भरवायचा तोंडी आदेश देतात. त्यातच पुरेसे अंतर ठेवून विद्यार्थी बसायची व्यवस्था होण्याऐवजी विद्यार्थ्यांना दाटीदाटीनं बसवावं लागतं. मग विद्यार्थी दाटीदाटीनं बसतात. मग कोरोना वाढणार नाही तर काय?

  एक अशीही शाळा आहे की ज्या शाळेत संस्थाचालकाने आपल्या हेकेखोर प्रवृत्तीमुळे शाळेची किल्लीच मुख्याध्यापकाला दिलेली नाही. त्या शाळेत तो संस्थाचालक दुपारी येतो व दुपारी एका पाळीत शाळा भरवतो. ज्या ठिकाणी पुरेशी विद्यार्थी बसायला जागा नाही. विद्यार्थी दाटीदाटीनं बसतात. त्या शाळेतील मुख्याध्यापकाला विचारले असता त्यानं सांगीतलं की साहेब, मला माझी नोकरी टिकवायची आहे. मी जर संस्थाचालकाच्या विरोधात गेलो की मला संस्थाचालक शाळेतून काढून फेकेल. माझे वेतन बंद होणार. मग मला कोण तारणार.अशा ब-याचशा शाळा आहेत की ज्या शाळेत मुख्याध्यापक असेच लाचार असतात. ते संस्थाचालकाला घाबरत असतात. ते त्याला काढून फेकतील अशी त्यांना भीती असते. त्यातच त्यांचे वेतनही बंद होणार अशीही भीती असते.

  आज अशी बरीचशी प्रकरणे घडली आहेत की ज्या शाळेतील मुख्याध्यापक असा रबरस्टँप बनून राहात नाही. त्या त्या शाळेत मुख्याध्यापकाला असेच संस्थाचालकाने काढून फेकलेले आहे. निलंबीतही केलेले आहे.संस्थाचालक असा असतो की जो कायद्याचा आधार घेवून कोणावरही खटला टाकत असतो. जो शिक्षण विभागातील कर्मचारी असेल. असे शिक्षण विभागातील कर्मचारी की ज्यांना स्वतःच्या पदाची पर्वा असते. ते संस्थाचालकाच्या वाट्याला जात नाहीत. संस्थाचालक असे खटले लढतो. कारण त्याचेजवळ भरपूर पैसे असतात. त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून असा पैसा मिळतो नव्हे तर तो वसूल करतो. तो चांगल्या मार्गानं कमविलेला पैसा नसतो. तो पैसा गेलाही कोर्ट कचे-या लढतांना. तरी त्याला त्याची पर्वा नसते. परंतू असे कर्मचारी कोर्ट कचे-या लढत नाहीत. त्यामुळं ते संस्थाचालकांना घाबरतात.

  ओमीक्रानबाबत सांगायचं झाल्यास संस्थाचालकांनाही ओमीक्रानची भीती वाटत असते. तो घरातून बाहेर पडत नाही. परंतू त्यांच्या संस्थेतील कर्मचारी वर्गाला सतत ओमीक्रानच्या संपर्कात यावं लागतं. संस्थेअंतर्गत असलेली शाळा. त्या शाळेची वेळ ही सकाळ दुपार नसल्यानं सदरच्या शाळेतून ओमीक्रान वाढू शकतो. मागील वर्षीही अशा प्रकारच्या शाळेत विद्यार्थी दाटीवाटीनं बसल्यानं कोरोना वाढला आणि यावर्षीही संस्थाचालकाच्या गैरमर्जी तसेच गैरवर्तणुकीनं वागण्यामुळं कोरोना वाढू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यातच खरं कारण म्हणजे मागील वर्षीसारखाच कोरोना कदाचित म्हशानघाटासमोर लोकांना पुन्हा एकदा प्रेतासाठी रांग तर लावावी लागणार नाही अशीही भीती नाकारता येत नाही. त्यासाठी नागरीकांनी जागरुक राहायला हव.

  पालकांनीही जागरुक राहायला हवं. संचालकांनीही आपला हेकेखोरपणा सोडावा. तसेच विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षेसाठी शाळा दोन्ही पाळीत भरवावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियंत्रणासाठी दूरदूर बसवता येईल. कोरोना पसरु नये म्हणून काळजी घेता येईल. परंतू संस्थाचालकाला असे करायचे नाही. कारण त्यांना संबंधीत शाळेतील शिक्षक वर्गावर दबाव ठेवायचा आहे. तसेच त्यांना मुख्याध्यापकांना बदनाम करायचे आहे. मुख्याध्यापकही असे संस्थाचालकाच्या विरोधात जावू शकत नाही. कारण त्याला माहित आहे की तो जर संस्थाचालकाच्या विरोधात गेला तर त्याला संस्थाचालक नेस्तनाबूत करेल. परंतू त्यांना हे कळायला हवं की संस्थाचालक त्याला नेस्तनाबूत करेल तेव्हा करेल. परंतू ह्या छोट्या शाळेतील कळ्यांची जर व्यवस्थीत काळजी घ्यायला मुख्याध्यापक सक्षम ठरला नाही तर उद्या हाच कोरोना त्या मुख्याध्यापकाला सोडणार नाही. तसेच जो संस्थाचालक अशा मुक्या कळ्यांना त्रास देत अाहे. त्याच संस्थाचालकांना उद्या हाच कोरोना नक्कीच त्रास देईल असे वाटते. म्हणून आता तरी संस्थाचालकांनी सुधरायला हवं. तेव्हाच संस्थाचालकांनाही कोरोना चांगला ठेवेल. विद्यार्थ्यांनाही कोरोनाची भीती वाटणार नाही आणि म्हशानातही प्रेताच्या रांगा लागणार नाही. हे तेवढंच सत्य आहे.

  -अंकुश शिंगाडे
  नागपूर
  ९३७३३५९४५०
(छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या