हैदराबाद : कोरोना संकटातही प्रस्थापित हिंदी चित्रपटांना मागे टाकत अखिल भारतीय स्तरावर ख्याती आणि प्रसिद्धी प्राप्त करीत लक्षणीय कामगिरी केल्यानंतर तेलुगू अभिनेते अल्लू अर्जुन यांचा बहुचर्चित चित्रपट पुष्पा अँमेझॉन प्राईमवर प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
पुष्पा : दि राईज तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह ७ जानेवारी शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. देशात हिंदी भाषिक भागाला लाभलेला प्रतिसाद लक्षात घेत पुष्पा काही दिवस चित्रपटगृहात राहणार आहे. हिंदी भागही लवकरच डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होणार आहे परंतु अजून अधिकृत घोषणा झाली नाही. पुष्पा : दि राईज चित्रपसाठी दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांचे जाहीर कौतुक करीत शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुष्पा चित्रपटातील सर्व गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले तसेच सामाजिक माध्यमांवर सर्व विक्रम तोडीत नवीन विक्रम प्रस्तापित केला तर संपूर्ण जगात प्रदर्शन करून ३00 कोटींपेक्षा जास्त कमाई करीत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
अभिनेते अल्लू अर्जुन, रश्मीका मंदाना आणि संपूर्ण चित्रपटवृंदाने चित्रपटाच्या प्रसिद्धी-प्रचार प्रसार कार्यसाठी हैदराबाद , चेन्नई, तिरुअनंतपुरम, बंगलोर, मुंबईचा दौरा केला. यावेळी अल्लू अर्जुन यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व भाषांमध्ये पुष्पा चित्रपटातील गाण्यांना आणि अन्य चित्रफितींना जबरजस्त प्रतिसाद लाभला आहे.
अभिनेते अल्लू अर्जुन रश्मीका मंदाना यांचे नवे रूप आणि संगीत दिग्दर्शक देवीश्री प्रसाद यांच्या कलाकृतीस मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षकांद्वारे प्रतिसाद प्राप्त होत असून कौतुक होत आहे. गाण्याची सर्व भाषांमध्ये विक्रमी घोडदौड सुरु आहे. चित्रपटात समंथा प्रभू रूथ यांचे विशेष गाणे देखील आहेत.पुष्पा : दि राईज आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमावर्ती भागात विशेषत: तिरुपती येथील अरण्यात चंदन तस्करी या विषयावर एक काल्पनिक कथा आहे.अला वैकुंठ पुरमलो ह्य च्या भव्य यशानंतर अभिनेते अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. आपल्या आवडत्या बनीला नवीन रूपात पाहण्यासाठी अखिल भारतीय प्रेक्षक आतुर होते.
चित्रपटाची कथा, पात्र दमदार संवाद, वाक्य, कथासंदर्भ आणि प्रमुख आणि केंद्रीय पात्रांच्या भूमिका अधोरेखित झाल्या आहेत . उच्च कोटींचे छायांकन, भारदस्त अभिनय, धीर-गंभीर पार्श्व संगीतासह पुष्पा सर्व भाषांमध्ये पसंत करण्यात आला. चित्रपटात अभिनेत्री रश्मीका मंदाना , फहाद फासल, सुनील, अनसूया भारद्वाज, राव रमेश, धनंजय यांच्यासह सर्व भाषांमधील कलाकार आहेत. पुष्पा च्या तेलुगू भागासाठी मुख्य खलनायक आणि मल्याळम अभिनेते फहाद फासल यांनी तेलुगू भाषा शिकून स्वत: आवाज दिला आहे. पुष्पा च्या हिंदी भागासाठी अभिनेते श्रेयस तळपदे यांनी अभिनेते अल्लू अर्जुन यांना आवाज दिला आहे. अनेक वषार्नंतर पुन्हा एकदा अल्लू अर्जुन- दिग्दर्शक सुकुमार एकत्र आले. यापूर्वी आर्या आणि आर्या २ या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. चित्रपटाची निर्मिती मायथ्री मुव्ही मेकर्स -मुत्तमसेट्टी मीडिया यांनी केली आहे .
२0२0 वर्षी स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन यांनी पुन्हा एकदा सुपेरी पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले . अभिनेते अल्लू अर्जुन यांचा अला वैकुंठ पुरमलो हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. अला वैकुंठ पुरमलो हा चित्रपट सन नेक्स्ट आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
0 टिप्पण्या