अमरावती : गावातील रस्ते, पूल, पाणी पुरवठा, वीज या मुलभूत नागरी सुविधांची निर्मिती करताना कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्यावा. शाळेतील वर्गखोल्या, सभागृह, व्यायामशाळांमध्ये अद्ययावत उपकरणांची व्यवस्था व त्याची वेळोवेळी देखभाल करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अचलपूर तालुक्यातील राजनाथ-मेघनाथपूर-बोरगाव पेठ ते निजामपूर रस्त्याचे डांबरीकरण, गावातंर्गत 200 मिटर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे असे 2 कोटी रुपये निधीतून करण्यात आलेल्या कामाचे भूमिपूजन श्री.कडू यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सरपंच शिवराज काळे, उपसरपंच विश्वास भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पराग सोटे, उपअभियंता अविनाश बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना, विशेष प्राप्त निधी, तांडा वस्ती योजना अशा विविध योजनेतील सुमारे 12 कोटी रुपयांच्या प्राप्त निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन श्री.कडू यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते.
अचलपूर तालुक्यातील भुगाव येथे विशेष निधीतुन प्राप्त ग्रामपंचायत परिसरात महादेव मंदीर सभागृहाचे बांधकाम 21 लक्ष रुपये, 10 लक्ष रुपये निधीतून रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकामाचे लोकार्पण, जिल्हा वार्षिक योजनेच्या 43 लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण श्री.कडू यांनी केले. जवर्डी व शेकापूर येथे ग्रामपंचायत परिसरात सभागृहाची निर्मिती व अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करण्यात आले. जवर्डी व शेकापूरला 32 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहीती संबंधीतांनी यावेळी दिली.
निजामपूर ग्रामपंचायतीचे सभागृह, अंतर्गत रस्ता बांधकामाचे 22 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण श्री. कडू यांनी केले. नायगाव येथे समाजमंदिराचे सौंदर्यीकरणासाठी 5 लक्ष, मागासवर्गीय वस्तीतील रस्त्यासाठी 10 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात आलेल्या कामाबाबत श्री.कडू यांनी सुचना केल्या. बळेगाव येथे काँक्रीटीकरण व बौद्ध मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी 17 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.बोपापुर, चमक खुर्द, खोजनपुर,सुरवाडा, नायगाव,बोर्डी, चौसाळा,कवीठा, देवमाळी व सावळी उदान या गावातील अंतर्गत रस्ते, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रुंदीकरण, सभागृहे आदींच्या कामाचे लोकार्पण श्री.कडू यांनी केले. यावेळी संबंधित अधिकारी नागरिक उपस्थित होते.
बामणी-बल्लारपूर-चंद्रपूर-यवतमाळ-अमरावती-अचलपूर-हरीसाल-धारणी-बऱ्हाणपूर रस्त्याचे डांबरीकरण व नुतणीकरण करणे, अचलपूर शहरी रस्त्याचे बांधकाम, परतवाडा ते अचलपूर शहर रस्ता,अचलपूर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाची 32 कोटी 46 लक्ष रुपयांच्या निधीतून सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.कडू यावेळी दिले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या