अमरावती : कोविडचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात पुढील एक आठवडा शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर व अपर जिल्हा दंडाधिकारी आशिष बिजवल उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोविड पॉजिटिव्हिटी दर 25 टक्क्यांवर आहे. शेजारच्या अकोला जिल्ह्यात कोविड रूग्णसंख्या दर 50 टक्क्यांपर्यंत आहे. वय 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण आताच सुरू झाले आहे. या स्थितीत पहिली ते बारावी शाळा सुरू करणे योग्य ठरणार नाही. आणखी एक आठवडा प्रतीक्षा करून पॉझिटिविटी दरात घसरण झाल्यास निर्णय घेण्याचे यावेळी ठरले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या