मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचा सध्या सुखाचा संसार सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी या दोघांनी एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. आता त्यांच्या चाहत्यांना जोडप्याच्या घरात पाळणा कधी हलणार याची उत्सुकता आहे.
या विषयी प्रियंका आणि निक यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत. आता खुद्द प्रियंकानेच यावर उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत प्रियंकाने या प्रश्नावर सविस्तर खुलासा केला आहे. घर आणि मुलं ही आयुष्याचा खूप मोठा भाग असल्याचे तिचे म्हणणे आहे.
व्हॅनिटी फेअर या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका म्हणाली की, आम्ही कुटुंब नियोजनाविषयी भविष्यातील काही बेत आखत आहोत. अर्थात मला आणि निकला मुलं आवडतात. भविष्यात ती आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग ठरतील. मला आई व्हायचं आहे. देवाच्या कृपेने जेव्हा हे घडायचं असेल, तेव्हा ते होईलच. पण, सध्या आम्हाला याची काहीच घाई नाही, असं प्रियंका म्हणाली आहे.
आपल्या कामातील व्यग्रतेबाबत ती म्हणाली की, मी आणि निक सध्या कामात इतके व्यग्र आहोत की आम्हाला आमच्या खासगी आयुष्यासाठी वेळ देता येत नाही. स्वत:चे घर घेणे, मुले जन्माला घालणे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खरेच खूप जवळच्या आहेत. पण, सध्या वेळ नसल्याने आम्ही घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला निक याचाही दुजोरा असल्याचे प्रियंकाचे म्हणणे आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या