Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

'आरआरआर'च्या प्रदर्शनासंदर्भात नवीन घोषणा

    हैदराबाद : बाहुबली दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या बहुचर्चित आणि बहुभाषी अखिल भारतीय आरआरआर चित्रपटाच्या वृंदाने चित्रपट प्रदर्शनासंदर्भात नवीन घोषणा केली.

    सामाजिक माध्यमांवर अधिकृत घोषणा करताना आरआरआरच्या वृंदाने स्पष्ट केले, देशात जर कोरोनाची स्थिती सुधारली आणि सर्व चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु झालीत तर आरआरआर १८ मार्च २0२२ रोजी प्रदर्शित होईल, नाही तर चित्रपट २८ एप्रिल २0२२ रोजी प्रदर्शित होईल.नव्याने निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या प्रभावामुळे तसेच विविध राज्यात चित्रपटगृहांची स्थिती आणि नवीन निर्देश लक्षात घेत चित्रपटाचे प्रदर्शन ढकलण्यात आले होते. बाहुबलीच्या वैश्‍विक यशानंतर ह्य आरआरआर ७ जानेवारी २0२२ रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार होता. मात्र पुन्हा एकदा कोरोनामुळे आरआरआर चित्रपटाचे प्रदर्शन बाधित झाले.

    ह्य आरआरआर ह्य अल्लुरी सीताराम राजू आणि कोमरम भीम या महान क्रांतिकारकांच्या जीवनावर एक काल्पनिक चित्रपट आहे. रौद्राम.. रणम .. रुधिरम' अशी चित्रपटाची संकल्पना आहे. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर कोमरम भीम तर रामचरण अल्लुरी सीताराम राजूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र आले असून बाहुबलीनंतर दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी दोघांनी वेगवेगळ्या चित्रपटात दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्यासोबत काम केले आहे. अभिनेत्री ओलिव्हिया मॉरिस, अँॅलिसन डूडी आणि रे स्टीव्हनसन यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तराचे तंत्रज्ञ-कलाकार चित्रपटात सहभागी आहेत. चित्रपटात अभिनेते अजय देवगण, समुद्रकणी र्शिया सरण आणि आलिया भट आणि अन्य भाषांमधील आणि देशांच्या कलाकारांचा देखील समावेश आहे. ह्य आरआरआर ह्य साठी संगीत एम एम किरवाणी यांचे असून सेंथिल कुमार छायाचित्रकार आहेत. तर कथा जेष्ठ आणि प्रथितयश लेखक, आणि दिग्दर्शक एस एस राजमौली यांचे पिता तसेच बाहुबलीचे रचनाकार के व्ही विजयेंद्र प्रसाद यांची आहे. वेशभूषा रमा राजमौली यांची आहे. निर्मिती रचना साबू सिरिली यांची असून दृश्य तंत्रज्ञ श्रीनिवास मोहन आहेत.

    आरआरआरच्या संगीताचे अधिकार लहरी म्युजिक आणि टी सिरीज या संस्थांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेसाठी प्राप्त केले आहे तर चित्रपटाची निमिर्ती, लायका प्रॉडक्शन, पेन इंडिया लिमिटेड, के व्हीएन प्रोडक्शन, डीव्हीव्ही एंटरटेनमेंट, यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे.आरआरआर चित्रपटाची नूतन प्रदर्शन तारीख जाहीर झाल्याने मोठ्या प्रमाणावर रसिक आणि चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र चाहत्यांना आणि रसिकांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. आरआरआर चित्रपटातील दमदार झलक सामाजिक माध्यमांवर पूर्वीच प्रदर्शित करण्यात आली असून सर्व भाषांमध्ये अग्रस्थानी आहे. अनेक आठवड्यानंतरही ही झलक आकर्षण आणि कौतुकास पात्र ठरत आहे. आरआरआर चित्रपटातील सर्व गाणी सर्व भाषांमध्ये आजही सामाजिक माध्यमांवर अग्रस्थानी आणि प्रसिद्ध आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code